Bhosari : भोसरी येथे आढळले पुरुष जातीचे मृत अर्भक

एमपीसी न्यूज – भोसरी येथील बालाजीनगर झोपडपट्टी येथील (Bhosari) नाल्यामध्ये पुरुष जातीचे मृत अर्भक शुक्रवारी (दि.15) सापडले.यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात पोलीस कर्माचारी सुनिल औटी यांनी फिर्याद दिली असून अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

जन्मानंतर त्याची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने हे अर्भक नाल्यात (Bhosari) टाकल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र केवळ स्त्री जातीचे नाही तर आता एक पुरुष अर्भक देखील नाल्यात टाकल्याचे उघडकीस आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे अर्भक कोणी व का टाकले याचा भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

Pune : युवकांचा पुणे ते केदारनाथ 1900 किलोमीटरचा सायकल प्रवास

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.