Bhosari : पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा यशस्वी – विलास मडिगेरी (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- पहिल्या टप्प्यात मेट्रोमार्ग लांबवण्याचा मुद्दा बजेट सत्रात मांडणार असल्याचे आश्वासन आमदार महेश लांडगे यांनी शहरवासीयांना दिले होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पिंपरी ते निगडी व नाशिक फाटा ते चाकण या वाढीव मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करण्यास मेट्रोला सांगितले आहे. या वाढीव मेट्रो मार्गाच्या डीपीआरचे काम झाले असून पिंपरी ते निगडी या मार्गाचा डीपीआर केंद्र शासनाच्या तर नाशिक फाटा ते चाकण या मार्गावरील मेट्रोचा डीपीआर महापालिकेकडे जमा करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा यशस्वी झाला असल्याचे मत स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी व्यक्त केले.

पिंपरी ते निगडी आणि नाशिक फाटा ते चाकण या मार्गावर मेट्रो पहिल्या टप्प्यात होणे गरजेचे असून त्याचा पाठपुरावा आमदार लांडगे करीत आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही दोन शहरे एकमेकांसाठी पूरक आहेत. त्यामुळे पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवड शहराला देखील न्याय मिळायला हवा. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरु आहे. यामध्ये पिंपरी ते निगडी या मार्गाचे देखील काम झाले तर ते नागरिकांसाठी फायद्याचे ठरेल. पहिल्या टप्प्यात पिंपरी ते निगडी या मार्गावर मेट्रो सुरु झाली तर पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे एक तृतीयांश नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल.

मेट्रोमुळे शहराच्या सुंदरतेत भर पडणार आहे. तसेच नागरिकांचा वेळ वाचणार आहे. प्रदूषणावर मोठ्या प्रमाणात आळा बसेल तसेच वाहतुकीच्या कोंडमारीतून नागरिकांना सुटका मिळेल. मेट्रोचे थांबे ठराविक अंतरावर असल्याने फार कमी वेळेत नागरिकांना इच्छित स्थळी पोहोचता येईल. त्यामुळे पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो होणे गरजेचे आहे. मेट्रो निगडीपर्यंत नेण्यासाठी सर्व स्तरांवर आमदार लांडगे यांनी पाठपुरावा केला आहे.

विलास मडिगेरी म्हणाले, “पिंपरी ते निगडी आणि नाशिक फाटा ते चाकण या मेट्रोसाठी आमदार महेश लांडगे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. पिंपरी ते निगडी या मार्गाचा डीपीआर केंद्र शासनाच्या तर नाशिक फाटा ते चाकण या मार्गावरील मेट्रोचा डीपीआर महापालिकेकडे जमा करण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला यामुळे चालना मिळणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत झाल्यास वाहतूक कोंडी, प्रदूषण यांसारख्या समस्या येणार नाहीत. नागरिकांच्या वेळेची बचत होईल. आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून विविध विकासकामांचा पाठपुरावा केला जात आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.