Pimpri : भाजपा ओल्ड इज गोल्डच्या टीमने केला विलास मडेगिरी यांचा आपुलकीचा सन्मान !

एमपीसी न्यूज- भाजपाचे नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्ष विलास मडीगेरी यांचा शुक्रवारी (दि. 8) ओल्ड इज गोल्ड भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपुलकीचा सन्मान केला. या सन्मानाने भावुक झालेल्या विलास मडेगिरी यांनी आपल्या सगळ्या जुन्या सवंगड्यांसमोर आपल्या राजकीय जीवनाचे चढउतार अगदी मनमोकळेपणाने मांडले.

यावेळी बोलताना मडिगेरी यांनी महापालिकेत पक्षाने दिलेल्या या जबाबदारीचे स्वागत करुन पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ करुन दाखवण्याचे आश्वासन त्यांनी कार्यकर्त्यांसमोर दिले. भाजपच्या सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांना महापालिकेत सन्मानाची वागणूक मिळेल. त्यांच्या प्रत्येक कामाला योग्य न्याय दिला जाईल असेही विलास मडेगिरी यांनी सांगितले. जुन्या कार्यकर्त्यांकडुन मिळालेला हा सन्मान म्हणजे मला अत्यंत स्वच्छ पध्दतीचे कामकाज करण्यासाठी मिळालेला खरा आशीर्वाद आहे, असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाला ओल्ड इज गोल्डचे प्रमुख राजू दुर्गे यांच्यासह नगरसेवक मोरेश्वर शेडगे, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, शहर सरचिटणीस प्रकाश जवळकर, महादेव कवितके, शहर उपाध्यक्ष शेखर लांडगे, गणेश चव्हाण, नंदू भोगले, दत्ता कोरडे, संतोष घुले, द्वारकानाथ कुलकर्णी, पोपट हजारे, मंडल अध्यक्ष अजय पाताडे, दीपक कुलकर्णी, विजय शिनकर, दिलीप गोसावी, देवदत्त लांडे, दत्ता तापकीर, बापुसाहेब भोसले, रमाकांत पाटील, छाया पाटील, पुष्पा सुबंध, शोभा भराडे, राजश्री जायभाय, आशा काळे, राधिका बोरलीकर, नीता कुशारे, वीणा सोनवलकर, रेखा कडाली, गीता महेंद्रु, विमल सानप, शबाना इनामदार, प्रमिला शिनकर, भिकाजी भोज, शशिकांत पाटील, कुमार कोनकर, प्रदीप सायकर, सुभाष पाठक, बालाजी कानवटे, आनंदा पाटील, प्रकाश सूर्यवंशी, संजय ओव्हाळ, जयदेव डेमरा, अमीर मुल्ला, यशवंत कोळेकर, दत्तात्रय यादव, प्रकाश हगवणे, रवींद्र कुदळे, शिवदास हांडे, प्रकाश धोंडे, अप्पा धावडे, बशीर सुतार, सुनील सूर्यवंशी, सुनील वाट आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी केले. सूत्रसंचालन देवदत्त लांडे यांनी तर आभार दीपक कुलकर्णी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.