Ganpati Visarjan : इंद्रायणीनगरमधील गणेशाचे विसर्जन; विलास मडिगेरी यांनी केले बाप्पाचे स्वागत

एमपीसी न्यूज – भोसरी, इंद्रायणीनगर येथील मोरया प्रतिष्ठानसह (Ganpati Visarjan) विविध मंडळांच्या गणेशाचे ढोल ताशांच्या गजरात आणि भावपूर्ण वातावरणात विसर्जन झाले.

महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती, भाजपचे ज्येष्ठ नेते विलास मडिगेरी यांच्या हस्ते मंडळांच्या गणेशमूर्तीस पुष्पहार अर्पण करुन स्वागत करण्यात आले.

Ganpati Visarjan

Pune Ganapati Visarjan : मानाच्या पहिल्या कसबा आणि दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचे पारंपारिक पद्धतीने विसर्जन

मोरया प्रतिष्ठानचे बाप्पा रथात (Ganpati Visarjan) विराजमान झाले होते. रथावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. इंद्रायणीनगरमधीलच साम्राज्य प्रतिष्ठान, समता मित्र मंडळ, चैतन्य पार्क मित्र मंडळ, सम्राट कॉलनी मित्र मंडळ, संतनगर युवा प्रतिष्ठानच्या गणेशाचे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात विसर्जन झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.