Ganpati darshan tour : पीएमपीएमएलच्या ‘गणपती दर्शन’ बसचा 1 हजारापेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी घेतला लाभ  

एमपीसी न्यूज : “महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत पुणे महानगरपालिका व ‘पीएमपीएमएल’च्या सहकार्याने गेल्या आठवड्यापासून ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रथमच गणपती दर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच सहलीचा 1 हजार पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला आहे.(Ganpati darshan tour) या सहलीचा समारोप शनिवार (दि. 7) शनिवारवाडा येथे करण्यात आला.

यावेळी विभागीय पर्यटन कार्यालयाच्या सहाय्यक संचालक सुप्रिया करमरकर-दातार, चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर  दत्तात्रय झेंडे व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Ganpati darshan tour) यासाठी पीएमपीएमलने पाच वातानुकुलीत बसेस विनाशुल्क देण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमांतर्गत 1 हजार पेक्षा अधिक जेष्ठ नागरिकांनी गणपती दर्शनाचा लाभ घेतला. महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रसाद लोढा यांनी राज्यातील 4 शहरांमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता, परंतु केवळ सर्वोत्तम प्रतिसाद आणि व्यवस्था वरील सर्व विभागांनी केल्याचे पर्यटन विभागाने सांगितले व ‘पीएमपीएमएल’चे प्रशस्तीपत्र देऊन आभार मानले, अशी माहिती यांनी दिली.

Pimpri : शगुन चौकातील दुकानात सव्वा लाखाची चोरी

1 ते 7 सप्टेंबर गणेशोत्सव कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मुर्तीचे दर्शन ज्येष्ठ नागरिकांना घेता यावे यासाठी ‘गणपती दर्शन’ सहलीचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत वय 60 वर्षे व त्याहून अधिक वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांकरिता पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मुर्तीचे दर्शन घेता यावे यासाठी पुणे विभागीय पर्यटन कार्यालयामार्फत आयोजन केले होते.(Ganpati darshan tour) यावेळी या बसेसच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांनी कसबा,तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशी बाग, केसरी वाडा, भाऊ रंगारी, श्रीमंत दगडूशेठ, शारदा गणपती या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मुर्तीचे दर्शन घेण्याचा लाभ जेष्ठ नागरिकांना मिळाला. या ‘गणपती दर्शन’ सहलीचा समारोप शनिवारवाडा येथे करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.