Pimpri : शगुन चौकातील दुकानात सव्वा लाखाची चोरी

एमपीसी न्यूज – शगुन चौकातील दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी सव्वा लाखांचा ऐवज चोरून (Pimpri) नेला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.6) रात्री दहा ते बुधवारी (दि.7) सकाळी अकरा या कालावधीत घडला आहे.

सुमित मुलचंद चांदवानी (वय 27, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bawdhan car fraud : मॉडीफाय करण्यासाठी आलेल्या गाडीची परस्पर विक्री

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकान बंद असताना चोरट्यांनी शटरचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश करत त्याद्वारे दुकानातील 85 हजार रुपयांचे चार मोबाईल, 25 हजार रुपयांची 3 मनगटी घड्याळे व रोख रक्कम 25 हजार असा एकूण 1 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून (Pimpri) नेला आहे. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.