Bhosari : इंद्रायणीनगरमध्ये गौरी सजावट स्पर्धा

एमपीसी न्यूज – भोसरी इंद्रायणीनगर (Bhosari) येथील प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांसाठी गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महिलांनी सहभाग घ्यावा,असे आवाहन स्पर्धेचे आयोजक भाजप सरचिटणीस विलास मडिगेरी यांनी केले आहे.

स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणार्‍यास 21 हजार 111, द्वितीय 15 हजार 111, तृतीय 11 हजार 111, चतुर्थ 7 हजार 111, पाचवा क्रमांकास 5 हजार 111 रुपयांचे बक्षिस असणार आहे.

ही स्पर्धा प्रभाग क्रमांक 8 मधील महिलांसाठीच असून स्पर्धकांच्या आधारकार्डवरील पत्ता प्रभागातील असणे बंधनकारक आहे. गौरी सजावटीचा 30 ते 60 सेंकदाचा व्हिडिओ तसेच गौरी सजावटीचा स्पर्धकासहीत 1 रंगीत फोटो, 9579331100 या व्हाट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवावा.

Pune : भारतीय लष्कराच्या सदर्न कमांड तर्फे ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती; लष्करातील 300 हून अधिक अधिकारी व जवानांची उपस्थिती

परीक्षक सहभागी स्पर्धकांच्या घरी येऊन सजावटीचे (Bhosari) परीक्षण करतील. प्रत्येक सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. स्पर्धेतील सहभागासाठी 8007583904 या क्रमांकावर संपर्क साधावा.

स्पर्धेकाचे आधारकार्ड आणि लोकेशन 9579331100 या क्रमांकावर पाठवावे. मागील वर्षाचे आणि यंदाचे पारितोषिक वितरण गणेश विसर्जनानंतर करण्यात येणार आहे, असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.