Bhosari : राम मंदिर प्राणप्रतिष्ठादिनी दिवाळी साजरी करण्याचे आमदार महेश लांडगे यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त(Bhosari) देशभरात मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत दिवाळी साजरी करुया. ‘‘मनामनांमध्ये श्रीरामचा नारा देवूया आणि घराघरांमध्ये उत्सव साजरा करुया..’’ असे आवाहन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Bhosari )देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (दि. 22) आहे. यानिमित्त देशभरामध्ये उत्सव साजरा होत आहे.

 

Alandi : आळंदी पोलिसांचा दारूभट्टीवर छापा

आमदार महेश लांडगे म्हणाले की, प्रभू श्रीराम हे भारतीयांच्या अस्मितेचे प्रतीक आहे. अयोध्या येथे मंदिर व्हावे. यासाठी अनेक पिढ्यांनी संघर्ष केला. न्यायालयीन लढा उभारला. कार सेवकांनी प्रसंगी बलिदान दिले आहे. 15 व्या शतकापासून आम्हा हिंदू बांधवांना या मंदिराची प्रतीक्षा होती. आमच्या अनेक पिढ्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होत आहे.

‘रामराज्य’ ही संज्ञासुद्धा प्रभू श्रीराम यांच्या प्रेरणेतून आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ‘रामराज्य’च्या आदर्शातूनच स्वराज्याची प्रेरणा घेतली. असे प्रभू श्रीराम यांचे जन्मभूमी मंदिरामध्ये आगमन होत आहे. हा सोहळा आम्हाला पाहण्याचे भाग्य मिळाले. यापुढील हजारो पिढ्यांसाठी हे मंदिर आणि प्रभू श्रीराम प्रेरणा देत राहतील.

भारताच्या इतिहासामध्ये 22 जानेवारी 2024 हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. आदर्श पूत्र, राजा, बंधू आणि धर्माचराणामध्ये मर्यादापुरषोत्तम प्रभू श्री रामचंद्र हे हिंदू धर्म आणि अखंड भारत या संकल्पनेचा खरा दुवा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठा होत आहे, हा निश्चितच सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक सोहळा आहे, असे म्हणत घराघरांमध्ये दीपप्रज्ज्वलन करुन दिवाळी आणि उत्सव साजरा करुया, असे आवाहन देखील आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.