Bhosari News: संत निरंकारी मिशनद्वारे गुरुवारी रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज – संत निरंकारी मिशन अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनद्वारे येत्या (गुरुवारी) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दिघी रोड येथील संत निरंकारी सत्संग भवनात गुरुवार सकाळी 9 ते 5 या वेळेत रक्तदान शिबिर होणार आहे. कोरोनाच्या काळात प्रशासनातर्फे अनेक गोष्टींवर प्रतिबंध घालण्यात आले होते. त्यामुळे शहरात होणाऱ्या रक्तदान शिबिरांचे आयोजन होऊ न शकल्यामुळे शहरातील रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे.

कोरोनामुळे अनेक रुग्णांना रक्त, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा या सर्वांची अत्यंत आवश्यकता भासत होती. संत निरंकारी मिशनद्वारे एप्रिल 2020 पासून आतापर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये 18 रक्तदान शिबिरे पार झाली आहे. यामध्ये 1607 युनिट रक्त संकलन ससून रुग्णालय रक्तपेढी, वायसीएम रुग्णालय रक्तपेढी, कमांड रुग्णालय रक्तपेढी यांच्या मार्फत करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी अनेक वेळा आवश्यकतेनुसार प्लाझ्मादान करून अनेक कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचवले.

गेली तीस वर्षे भोसरी परिसरामध्ये स्वच्छता अभियान, वृक्षरोपण, रक्तदान शिबिर यांसारख्या सामाजिक कार्यामध्ये मिशन अग्रेसर आहे. या महाशिबिरात भोसरीतील नागरिकांनी रक्तदान करुन या मानवतेच्या कार्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन संत निरंकारी मिशनचे भोसरी प्रमुख अंगद जाधव यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.