Bhosari News : नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून 25 लाख आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

Harassment of a married woman demanding Rs 25 lakh from Maher for a new flat.

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणांवरून तसेच चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. तसेच नवीन फ्लॅट विकत घेण्यासाठी माहेरहून 25 लाख रुपये आणण्याची मागणी केली. ही घटना मे 2019 पासून 8 मार्च 2020 या कालावधीत घडली.

सुदीप मोतीलाल सोलंकी (वय 32), सासू नीता मोतीलाल सोलंकी (वय 55), नणंद तेजस्विनी मोतीलाल सोलंकी (वय 22, रा. औंध) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत 28 वर्षीय विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला सासरी नांदत असताना आरोपींनी संगनमत करून वेळोवेळी कधी स्वयंपाकाच्या कारणावरून तसेच चारित्र्यावर संशय घेऊन त्रास दिला. वडिलांकडून नवीन फ्लॅट विकत घेण्यासाठी 25 लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. वेळोवेळी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घरातून हाकलून देऊन ‘परत घरात आली तर जीवे मारिन’ अशी धमकी देऊन विवाहितेला उपाशी ठेऊन मानसिक व शारीरिक छळ केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.