Bhosari News : पीएमपीएमएलने सुरू केला भोसरी ते जुन्नर नवीन बसमार्ग

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल कडून मार्ग क्रमांक 356 भोसरी ते जुन्नर हा नवीन बस मार्ग सुरू करण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी येथे देशभरातून पर्यटक येतात. भोसरी ते जुन्नर (किल्ले शिवनेरी) या बस सेवेमुळे पर्यटक, नोकरदार, कामगार, विद्यार्थी यांची चांगली सोय होणार आहे.

भोसरी ते जुन्नर मार्गावरील कुमशेत गावचे सरपंच रवींद्र डोके, सामाजिक कार्यकर्ते सत्यवान डोके यांच्यासह अनेक ग्रामपंचायती व सामाजिक कार्यकर्ते यांनी सदरच्या बससेवेसाठी पाठपुरावा केला.

ढोलताशांच्या गजरामध्ये जुन्नर एसटी स्थानकापर्यंत बसची मिरवणूक काढण्यात आली. फुलांची आकर्षक सजावट केलेली पीएमपीएमएलची बस सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. शिवभक्त व नागरिकांनी सदरची बससेवा सुरु झाल्याचा आनंद लाडू वाटून साजरा केला.

सध्या या मार्गावर 3 बसेस द्वारे साधारणपणे दर 3 तासांनी बससेवा उपलब्ध असेल. भोसरी ते जुन्नर एकूण 10 फेऱ्या होणार आहेत. भोसरी ते जुन्नर पहिली बस सकाळी 5.30 वा. तर शेवटची बस संध्याकाळी 7.35 वा. आहे. तसेच मुक्कामी असणारी जुन्नरहून भोसरीसाठी सुटणारी पहिली बस सकाळी 6.30 वा. सुटेल तर जुन्नर ते भोसरी शेवटची बस रात्री 9 वा आहे.

असा असेल भोसरी ते जुन्नर बसचा मार्ग

 भोसरी ते जुन्नर या बससेवेचा मार्ग  भोसरी, मोशी, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, जुन्नर असा असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.