Anti-Drug Squad : गांजा ओढणाऱ्या तरुणाला अटक; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी (Anti-Drug Squad) पथकाने एका तरुणाला गांजा ओढत असताना अटक केली. त्याच्याकडून सात ग्रॅम गांजा व गांजा ओढण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 9) भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळ करण्यात आली.

विजय सर्जेराव सोनवणे (वय 29, रा. हुतात्मा चौक, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक मनोज राठोड यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri News: कंपोस्टिंग, झिरो वेस्ट, रेनवॉटर हार्वेस्टिंग, सौरउर्जा प्रकल्प कार्यान्वित असलेल्या आस्थापनांना सामान्य करात मिळणार ‘एवढी’ सवलत!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोनवणे हा भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या संरक्षक भिंतीजवळ गांजा ओढत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला (Anti-Drug Squad) मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी छापा मारून सोनवणे याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी सात ग्रॅम गांजा व गांजा ओढण्याचे साहित्य असा 150 रुपयांचा ऐवज जप्त केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.