Bhosari News: संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या शिबिरात 293 दात्यांचे रक्तदान

एमपीसी न्यूज – संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन, भोसरी शाखेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण 293 दात्यांनी रक्तदान केले.

भोसरीतील संत निरंकारी सत्संग भवन येथे गुरुवारी शिबिर संपन्न झाले. संत निरंकारी मंडळाचे पुणे झोन प्रभारी ताराचंद करमचंदानी यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन झाले.

ससून रुग्णालय रक्तपेढी यांनी 139 युनिट, तर यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढी यांनी 154 युनिट रक्त संकलन केले. विशेषतः कोरोना काळामध्ये संत निरंकारी मिशनच्या 170 अनुयायांनी यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये जाऊन गरजेनुसार रक्तदान करून अनेक रुग्णांचे प्राण वाचवले.

तसेच वेळोवेळी कोरोनाग्रस्त रुग्णांना प्लाझ्मादान करून माणुसकीचे दर्शन घडवले. मिशनच्या या नि:स्वार्थ कार्याची रुग्णालय प्रशासनाने प्रशंसा केली.

भोसरी शाखेचे प्रमुख अंगद जाधव यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले. हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मिशनच्या भोसरी शाखेच्या सर्व अनुयायांचे योगदान लाभले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.