Bhosari : पुणे-नाशिक महामार्गावर अवैधरित्या हुक्का पार्लर चालवणाऱ्या हॉटेलवर छापा

एमपीसी न्यूज – पुणे-नाशिक महामार्गावर (Bhosari) असणाऱ्या ‘निसर्ग’ या हॉटेलवर छापा टाकून तेथून अवैधरित्या सुरु असलेल्या हुक्का बारवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी (दि.8) रात्री केली आहे.

याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार प्रदिप शेलार यांनी फिर्याद दिली असून हॉटेल मॅनेजर अजय भालेराव (वय 22, रा. पिंपळे गुरव) व विकास नरेंद्र साहू (वय 21, रा.कासारवाडी) यांच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri Chinchwad Police : बदली रद्द न झाल्याने पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ लिपिकाचा उपोषणाचा इशारा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे ग्राहक जेवत असताना त्यांना जेवणासोबत धुम्रपानासाठी 0.5 टक्केवार असलेले तंबाखूजन्य हुक्का पदार्थ पुरवत होते. यावेळी (Bhosari) पोलिसांनी छापा मारून घटनास्थळावरून 40 हजार रुपयांचे हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट व इतर साहित्य जप्त केले. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.