New education policy : नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार – दिपक केसरकर

एमपीसी न्यूज : नवीन शैक्षणिक धोरण (New education policy) येत्या जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. यापुढे तांत्रिक शिक्षण देखील मराठीत दिलं जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.

यापुढे इंजिनियरिंग, मेडिकलचे शिक्षण मराठीत दिले जाणार असल्यामुळे याचा फायदा मराठी मिडियममध्ये शिकणाऱ्या मुलांना होणार आहे. केवळ महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण भारतात ही क्रांती घडत आहे. या क्रांतीचे प्रणेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत असेही ते म्हणाले.

Bhosari : पुणे-नाशिक महामार्गावर अवैधरित्या हुक्का पार्लर चालवणाऱ्या हॉटेलवर छापा

तसचं तब्बल 34 वर्षांनंतर देशात नवं शैक्षणिक धोरण लागू होणार असून या धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत देखील अनेक बदल करण्यात आले आहेत. (New education policy) देशात शालेय शिक्षणाचे स्वरुप आतापर्यंत 10+2 असं होतं. पण नव्या धोरणात दहावी किंवा बारावी परीक्षा ही बोर्डाची असेल, असा उल्लेख केलेला नाहीत. 10+2 ही शिक्षण पद्धत जाऊन त्याऐवजी 5+3+3+4 अशी नवी व्यवस्था लागू होईल असं त्यांनी सांगितलं.

नव्या शैक्षणिक धोरणानुसार, कसे असतील शैक्षणिक वर्षाचे टप्पे

पहिल्या टप्पा म्हणजेच पहिली पाच वर्ष : पूर्व प्राथमिकचे तीन वर्ष आणि इयत्ता पहिली ते दुसरी
दुसऱ्या टप्पा म्हणजे पुढील तीन वर्ष : इयत्ता तिसरी ते पाचवी
तिसऱ्या टप्पा म्हणजेच त्यानंतरची तीन वर्ष : सहावी ते आठवी
चौथ्या टप्पा म्हणजेच उर्वरित चार वर्ष : नववी ते बारावी

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.