Birtday wishes to Priyanka : प्रियांकावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

Happy Birthday to Priyanka

एमपीसी न्यूज – डॉ. अशोक आणि डॉ. मधू चोप्रा या लष्करातील दांपत्याची कन्या आणि सर्वात कमी वयाची मिस वर्ल्ड असे रेकॉर्ड असलेल्या अभिनेत्री प्रियांका चोप्राचा आज वाढदिवस. तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

फॅशन वर्ल्डमधून चित्रपटात पदार्पण करणारी प्रियांका ही 2000 साली भारतातली पहिली सर्वात कमी वयाची मिस वर्ल्ड झाली. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.  प्रियांका चोप्रा ही पहिली अशी अभिनेत्री ठरली जिने बॉक्सर मेरी कोमची भूमिका स्पोर्ट्स बायोपिकमध्ये अत्यंत उत्तमरित्या साकारली. तसेच प्रियांकाने अनेक जुन्या चित्रपटांच्या रिमेकमध्ये काम केलं. डॉन, दोस्ताना, अग्निपथ आणि जंजीर हे सगळे सिनेमा अमिताभ बच्चन यांनी अजरामर केले होते. या सिनेमांचे रिमेक करण्यात आले त्यात प्रियांका चोप्रा होती.

प्रियांका आणि तिची आई डॉ. मधू चोप्रा यांनी ‘व्हेंन्टिलेटर’ या मराठी सिनेमाची निर्मितीही केली.  या सिनेमात तिने ‘बाबा’ हे मराठीतील गाणंही गायलं आहे.  ती ही एक चांगली गायिकाही आहे.

प्रियांका चोप्राने संजय लीला भन्साळीच्या ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमात काशीबाई हे पात्र साकारलं होतं. त्यातील तिच्या अभिनयाचं चांगलंच कौतुकही झालं. तिने सुरुवातीला काम केलेल्या मधुर भांडारकरच्या ‘फॅशन’ या सिनेमाचं खूप कौतुक झालं.. यातलं ‘जलवा’ हे गाणं चांगलंच गाजलं होतं.  ‘व्हॉट्स युअर राशी’ या सिनेमात १२ भूमिका करणारी प्रियांका ही पहिली अभिनेत्री ठरली होती.

प्रियांकाने ‘क्वाटिंको’ या सीरिजमध्ये काम केलं आहे.  तो शो चांगलाच यशस्वीही ठरला. क्वांटिको या सीरिजसाठी तिला पीपल्स चॉईस अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं आहे.  पीपल्स चॉईस अवॉर्ड मिळालेली प्रियांका चोप्रा ही पहिली अभिनेत्री ठरली आहे. तसेच Mobi Series ची निर्मिती करणारी प्रियांका ही पहिली अभिनेत्री आहे.

प्रियांका चोप्राने प्रसिद्ध गायक निक जोनाससोबत लग्न केलंय.  प्रियांका निकपेक्षा अकरा वर्षांनी मोठी आहे. हे दोघेही इन्स्टाग्रामवर चांगलेच अॅक्टिव्ह असतात. नुकताच प्रियांकाने तिच्या सासूसोबतचा मजेदार व्हिडिओ शेअर केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.