Priyanka Congratulate Malala- ऑक्सफोर्ड विद्यापीठातून पदवी मिळवल्याबद्दल प्रियांकाने केले मलालाचे अभिनंदन

Priyanka Chopra congratulates Malala for graduating from Oxford University स्त्रीशिक्षणाबद्दल असलेला पराकोटीचा विरोध झुगारुन देऊन मलालाने हे यश मिळवले आहे. या तिच्या जिद्दीला सगळ्या जगातून सलाम करण्यात येत आहे.

एमपीसी न्यूज- अभिनेत्री प्रियांका चोप्रा-जोनासने नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजाई हिचे ऑक्सफोर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयातील पदवी मिळवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले आहे.

प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्रामवर मलालासह स्वत:चे एक चित्र पोस्ट केले असून त्यात तिने मलालाचे अभिनंदन केले आहे. ‘हॅपी ग्रॅज्युएशन, @ मलाला! ऑक्सफोर्ड मथून आपण घेतलेली तत्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्रातील पदवी ही एक अतुलनीय पराक्रम आहे. याचा मला खूप अभिमान आहे!’

मलालाने नुकतीच ऑक्सफोर्ड विद्यापीठातून पदवी मिळवली आहे. स्त्रीशिक्षणाबद्दल असलेला पराकोटीचा विरोध झुगारुन देऊन मलालाने हे यश मिळवले आहे. या तिच्या जिद्दीला सगळ्या जगातून सलाम करण्यात येत आहे.

तालिबान या अतिरेकी संघटनेने पाकिस्तानच्या वायव्य भागात मुलींच्या शिक्षणावर बंदी घातली होती. या बंदीविरुद्ध मलालाने लढा चालवला होता. तसेच या भागात महिलांच्या मानवी हक्कांच्या चाललेली पायमल्ली देखील तिने जगासमोर आणण्याचे प्रयत्न केले.

९ ऑक्टोबर २०१२ रोजी शाळेत जात असताना तालिबान अतिरेक्यांनी मलालावर तीन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मलालाला उपचारांसाठी इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरामध्ये हलवण्यात आले.

मलालावरील ह्या हल्ल्याची जगभर तीव्र नोंद घेतली गेली व अनेक देशांनी ह्या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला. या जीवघेण्या हल्ल्यामधून बचावलेल्या मलालाने स्त्री शिक्षणासाठी आपला लढा चालू ठेवण्याचे जाहीर केले.

१० ऑक्टोबर २०१४ रोजी मलालाला नोबेल शांतता पारितोषिक मिळाल्याचे जाहीर करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.