_MPC_DIR_MPU_III

Patanajali: पतंजलीचं कोरोनावरील औषध लाँच, १०० टक्के रुग्ण बरे होण्याचा रामदेव बाबांचा दावा

Ramdev’s Patanjali claims to have Covid-19 medicine, 100 percent recovery in 7 days या तिन्ही औषधांचा वापर केल्यानंतर कोरोनाचे संक्रमण संपुष्टात येऊ शकते आणि या आजारापासून वाचणे शक्य आहे. शरीरात ऑक्सिजनची कमतरता असल्यास श्वासारीमुळे फायदा होतो.

एमपीसी न्यूज- रामदेव बाबा यांनी आज (दि.23) कोरोना विषाणूवर आयुर्वेदिक औषध तयार केल्याचा दावा करत कोरोनिल नावाचे औषध लाँच केले आहे. या औषधाने कोरोना रुग्ण बरे झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. पतंजली योगपीठाचे प्रमुख रामदेव बाबा यांनी हे औषध लाँच करताना क्लिनिकल ट्रायलमध्ये यशस्वी ठरल्याचे म्हटले. आजपासूनच हे औषध बाजारात आणल्याचेही त्यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_IV

हे औषध पतंजली रिसर्च इन्सिट्यूट आणि नॅशनल इन्सिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूर यांनी मिळून केले आहे. कंपनीने दावा केला की, कोरोनिलचे क्लिनिकल ट्रायल अंतिम टप्प्यात आहे. सध्या याचे उत्पादन हरिद्वारमधील दिव्य फार्मसी आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड करत आहे.


बालकृष्ण यांच्या मते, कोविड-19 चा प्रादुर्भाव सुरु होताच वैज्ञानिकांची एक टीम यासाठी कामाला लागली होती. पहिल्या स्टिम्युलेशनने त्या कम्पाऊंड्सला ओळखण्यात आले जे या विषाणूशी लढताना शरीरात त्याचा प्रसार रोखतात.

शेकडो पॉझिटिव्ह रुग्णांवर या औषधाची क्लिनिकल केस स्टडी झाली. यामध्ये 100 टक्के निकाल मिळाला. कोरोनिल कोविड-19 च्या रुग्णांना 5 ते 14 दिवसांत बरे करु शकते, असा दावा त्यांनी केला.


बालकृष्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनिलमध्ये गिलोय, अश्वगंधा, तुळस, श्वासारि रस आणि अणू तेलाचे मिश्रण आहे. हे औषध दिवसात दोन वेळा सकाळी आणि सायंकाळी घेता येऊ शकते.

_MPC_DIR_MPU_II

दिव्य कोरोनिल टॅब्लेटचे यशस्वी परीक्षण केल्याचा दावा रामदेव बाबांनी केला. यामध्ये तीन औषधे आहेत. एक श्वासारी बट्टी, दिव्य कोरोनिल टॅब्लेट आणि अणू तेल. या तिघांचा एकत्रित उपयोग करावा लागणार आहे.


औषधाचे परीक्षण करताना 69 टक्के रुग्ण तीन दिवसांत बरे झाले. सात दिवसांच्या आत 100 टक्के रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला. सोमवारी Ordernil APP ऍप लाँच केले जाणार असून या माध्यमातून तीन दिवसांच्या आत घरी बसून औषध मागवता येईल.

या तिन्ही औषधांचा वापर केल्यानंतर कोरोनाचे संक्रमण संपुष्टात येऊ शकते आणि या आजारापासून वाचणे शक्य आहे. शरीरात ऑक्सिजनची कमतरता असल्यास श्वासारीमुळे फायदा होतो. हे सर्दी, खोकला आणि तापाचा एकाच वेळी सामना करते. अणुतेल नाकात सोडावे लागते. यामुळेही कोरोनापासून बचाव होतो.


प्लेसवो क्लिनिकल कंट्रोल ट्रायल 100 लोकांवर करण्यात आले. हे सर्व 15 ते 65 वयोगटातील आहेत. यात तीन दिवसांत 69 टक्के रुग्ण पॉझिटिव्हमधून निगेटिव्हमध्ये आले. औषध तयार करताना सर्व वैज्ञानिक गोष्टींकडे लक्ष देण्यात आले आहे. दुसरी ट्रायल लवकरच गंभीर रुग्णांवर केली जाणार आहे. या क्लिनिकल केस स्टडीमध्ये 280 रुग्णांचा समावेश होता.

100 लोकांवर क्लिनिकल कंट्रोल ट्रायल घेण्यात आली. 3 दिवसांत 69 टक्के रुग्ण पॉझिटिव्ह मधून निगेटिव्ह झाले आणि 7 दिवसांत 100 टक्के रुग्ण बरे झाले. मृत्यूचे प्रमाण 0 टक्के राहिले. 100 रुग्णांवर ट्रायल घेण्यात आली होती. सात दिवसांत अहवाल निगेटिव्ह आला.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.