Pune: कसबा विधानसभा निवडणूक प्रमुख हेमंत रासनेंच्या संकल्पनेतून हजारो महिलांच्या उपस्थितीत पार पडणार सोहळा 

एमपीसी न्यूज – विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याने वेगळी ओळख निर्माण (Pune)करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान कसबा विधानसभा निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून कसबा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या वतीने केला जाणार आहे.
यावेळी 21 रणरागिनींचा सत्कार हजारो महिलांच्या उपस्थितीत (Pune)पार पडणार आहे.
गेली अनेक वर्षांपासून मृणालिनी व श्री हेमंत रासने यांच्या माध्यमातून मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर शिक्षण, कला, क्रीडा, सामाजिक कार्य, व्यवसाय अशा अनेक क्षेत्रातील महिलांना गौरवण्यात येते. स्त्री सन्मान गौरव सोहळ्याचे यंदा 7वे वर्ष असून शनिवार दि 17 फेब्रुवारी 2024 रोजी नातूबाग मैदान, बाफना पेट्रोलपंप जवळ, बाजीराव रोड, पुणे येथे हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. यावेळी कसबा मतदारसंघातील जवळपास 12 ते 16 हजारांच्यावर महिला उपस्थित राहणार असल्याची माहिती हेमंत रासने यांनी दिली.

Pimpri : औद्योगिक क्षेत्र आणि विद्यार्थ्यांमध्ये दुवा साधण्यासाठी विविध उपक्रम – शेखर सिंह

याविषयी बोलताना हेमंत रासने म्हणाले, “आजच्या युगामध्ये स्त्रिया या कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या आपला वेगळा ठसा विविध क्षेत्रात उमटवत आहेत. देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी हे नेहमी महिलांच्या सबलीकरणासाठी आग्रही असतात. गेली ७ वर्षांपासून अविरतपणे आपल्या माध्यमातून या सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना प्रेरणा मिळेल, त्यांना आपले ध्येय गाठण्यासाठी प्रोत्साहन मिळावे हाच उद्देश आहे”.
स्त्री शक्तीचा सन्मान आणि हळदी कुंकू समारंभाला पुणे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल आणि प्रसिद्ध लेखिका संगिताताई बर्वे हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.