Bjp : पिंपरी विधानसभा प्रमुखपदी अमित गोरखे

एमपीसी न्यूज – भाजपने पिंपरी विधानसभेच्या (BJP) प्रमुखपदी अमित गोरखे यांची नियुक्ती केली आहे.
भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील 288 विधानसभा प्रमुखांची घोषणा केली. पिंपरी विधानसभेसाठी युवा उच्चशिक्षित चेहरा अमित गोरखे यांना संधी देण्यात आली आहे. गोरखे यांचे हे MBA, MA शिक्षण असून त्यांचा शांत व संयमी स्वभाव, उच्च शिक्षित इमेज आहे.
पिंपरी विधानसभा क्षेत्रात असलेला चांगला संपर्क यांचा फायदा पक्षाला नक्की होईल. नुकतीच त्यांनी पिंपरी विधानसभा क्षेत्रात काढलेली स्वातंत्र्यवीर सावरकर यात्रा यशस्वी ठरली होती.
Maharashtra News : मोठी बातमी; वन विभागामध्ये वनरक्षकांची भरती प्रक्रिया सुरु