BJP : विविध क्षेत्रातील सुमारे 200 महिलांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज – वडगाव शेरी व कॅन्टोन्मेंट भागांतील सुमारे 200 महिलांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये (BJP) प्रवेश केला. यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय, शैक्षणिक, धार्मिक तसेच कला क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा समावेश होता.

Alandi : आळंदीतील सर्व वारकरी शिक्षण संस्थांची चौकशी करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

श्यामा जाधव, प्रीती शिरीष काकडे तसेच प्रीती भट्टी पाटील यांच्या पुढाकाराने वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार आणि माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या तसेच पुणे महिला आघाडी शहराध्यक्षा हर्षदा फरांदे यांच्या उपस्थितीत हे पक्ष प्रवेश करण्यात आले. या मध्ये प्रामुख्याने गौतमी देवस्थळी (अभिनेत्री), साक्षी कपूर (अध्यात्मिक गुरु), प्रेमा मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांचा पक्षप्रवेश करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.