Pune : भाजपच्या पुणे महापालिकेतील सत्तेला 3 वर्षे पूर्ण

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेतील भाजपच्या सत्तेला रविवारी (दि. 23) तीन वर्षे पूर्ण झाले. 2017 च्या महापालिका निवडणुकीत पुणेकरांनी भाजपला एक हाती सत्ता देत 98 नगरसेवक निवडून दिले होते.

भाजपने पहिल्याच अंदाजपत्रकात पुणेकरांना अनेक मोठमोठ्या प्रकल्पांचे स्वप्न दाखविले होते. त्यामधील अनेक प्रकल्प केवळ कागदावरच आहेत. बालगंधर्व पुनर्विकास, महापालिकेचे स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय, भामा – आसखेड, 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजना, शिवसृष्टी, मेट्रो, चांदनी चौक उड्डाणपूल, शहरात विविध ठिकाणी प्रास्तावित उड्डाणपूल, अशा अनेक प्रकलपांचा समावेश आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like