Black Magic : वैकुंठ स्मशानभूमीत चितेजवळ जादूटोणा करणाऱ्या दोन तृतीयपंथीना अटक

एमपीसी न्यूज – पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दोन तृतीयपंथी चितेजवळ जादूटोणा (Black Magic) सारखे अघोरी कृती करताना आढळून आले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी दोन तृतीयपंथींना केली अटक. लक्ष्मी निबाजी शिंदे आणि मनोज अशोक धुमाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

वैकुंठ स्मशानभूमीत रात्री एक वाजण्याच्या सुमारास एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर काही तासाने शिंदे आणि धुमाळ हे चितेजवळ आले. दोघांनी त्यांच्यासोबत आणलेले काळ्या रंगाच्या बाहुल्या, काही लोकांचे फोटो, लिंबू, सूया आणि हळदी कुंकू हे साहित्य घेऊन काही तरी कृती (Black Magic) करीत होते.

Nighoje Murder : निघोजे येथे ‘दृश्यम’ स्टाईलमध्ये वडिलांचा खून; दोन मुलांना अटक

ही घटना स्मशानभूमीमधील एक कर्मचाऱ्याने पहिली. त्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी दोघांना रंगेहाथ पकडले.

प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात नरबळी व इतर अमानुष अघोरी, दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम 2013 कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.