Nighoje Murder : निघोजे येथे ‘दृश्यम’ स्टाईलमध्ये वडिलांचा खून; दोन मुलांना अटक

एमपीसी न्यूज – वडिलांचा खून करून दृश्यम चित्रपटाला शोभेल (Nighoje Murder) अशा प्रकारे दोन मुलांनीच प्रेताची विल्हेवाट लावल्याची घटना खेड तालुक्यातील निघोजे येथे घडली आहे. महाळुंगे पोलिसांनी दोन तासाच्या गुन्ह्याची उखल करून दोन सख्ख्या भावांना गजाआड केले आहे.

धनंजय नवनाथ बनसोडे (वय 43, रा. निघोजे, ता. खेड) असे खून (Nighoje Murder) झालेल्या इसमाचे नाव असून या प्रकरणी त्यांची मुले  सुजित  धनंजय बनसोडे (वय 21) आणि अभिजीत  धनंजय बनसोडे (वय 18) यांना महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे.

धनंजय नवनाथ बनसोडे यांचा फरसाण बनवण्याचा व्यवसाय असून त्यांची ग्लोबल फूड्स नावाची कंपनी आहे. मागील आठवड्यात (दि. 16 डिसेंबर) ते बेपत्ता असल्याची तक्रार महाळुंगे पोलिसात देण्यात आली होती.

Chikhali Murder : चिखली येथे मित्रांच्या वादात तरुणाचा खून

या बेपत्ता इसमाचा तपास करत असताना पोलिसांच्या लक्षात आले की, बेपत्ता धनंजय बनसोडे नागपूर येथील महिलेशी तीन वर्षापासून फेसबुक सोशल मीडिया द्वारे ओळख होऊन दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाल्याचे निष्पन्न झाले.

या प्रेम संबंधाची माहिती मिळाल्यानंतर धनंजय यांच्या घरात पत्नी व मुले सुजित आणि अभिजीत यांच्यामध्ये वारंवार वाद होऊ लागले. सदरचे प्रेम संबंध हे मुलांना मान्य नव्हते.

त्यामुळे आपली मुले आपला घातपात करून तिची ठार मारतील (Nighoje Murder) अशी शंका धनंजय यांना आली होती. अशा घातपाताबाबत धनंजय यांनी नागपूर येथील मैत्रिणीकडे संशय व्यक्त केला होता.

दरम्यान या तपासात महाळुंगे पोलिसांनी धनंजय यांची मुले सुजित धनंजय बनसोडे व अभिजीत धनंजय बनसोडे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला. तेंव्हा वडील धनंजय यांचे नागपुर येथील महिलेचे असलेल्या प्रेम संबंध मान्य नसल्यामुळे वडिलांचा खून (Nighoje Murder) करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे दोन्ही मुलांनी कबूल केले.

त्यामुळे त्वरित सदर गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे. महाळुंगे पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.