Bopkhel News : बोपखेलच्या विद्यार्थिनींनी गिरवले स्व:संरक्षणाचे धडे

एमपीसीन्यूज : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Shivsena chief Balasaheb Thackeray ) यांच्या जयंतीचे औचित्य साधून युवती सेनेच्यावतीने ( Yuvati sena) बोपखेल ( Bopkhel) येथे महिला आणि मुलींसाठी स्व-सुरक्षा ( Self Defence) व आरोग्य विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित विद्यार्थिनींनी स्व:संरक्षणाचे धडे गिरवले.

पिंपरी विधानसभा युवती प्रमुख प्रतिक्षा घुले ( Yuvati sena Chief Pratiksha Ghule) यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

शिवसेना शिरूर लोकसभा महिला संघटिका सुलभा उबाळे, युवा सेना मावळ तालुका अधिकारी पै. अनिकेत घुले यांच्यासह वैशाली कुलथे, आशा भालेकर, अनिकेत तापकीर, नाना सुपे, शशीकांत घुले, समिर झपके, निलेश हाके, भाग्यदेव घुले, महेंद्र वाघमारे, विठ्ठल घुले, मारुती झपके आदी उपस्थित होते,

समाजात महिला आणि मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर महिला आणि मुलींना स्व:संरक्षणाचे प्रशिक्षण असणे गरजेचे आहे. त्यासाठी महिला आणि मुलींनी संकट काळात स्वतःचे संरक्षण कसे करायचे याबाबत ध्रुवा ॲकडमीच्या रुपाली साईखेडकर यांनी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.

तसेच किरण राहणे यांनी हायजेनिक व पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिन (Eco-friendly sanitary napkins) विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्व युवती व महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले.

शिवसेना शाखाप्रमुख संतोष गायकवाड, दक्षता समिती सदस्य रवी कोवे, युवा सेना उपविभाग अधिकारी सनी कड यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रवी कोवे यांनी केले. आभार प्रतिक्षा घुले यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.