Moshi : इंद्रायणी नदीत दोघेजण बुडाले; शोध सुरू

एमपीसी न्यूज – मोशीतील इंद्रायणी नदीत दोघेजण बुडाले. ही घटना शनिवारी (दि. 12) घडली. बुडालेल्या तरुणांचा शोध अग्निशामक दलाचे जवान घेत आहेत.

Pune : राज्यातील 186  कैद्यांची कारागृहातून होणार सुटका

शक्तिमान कुमार (वय 20), सोनू कुमार बैठा (वय 20, दोघेही रा. बिहार) अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोशी येथील इंद्रायणी नदीमध्ये शनिवारी दोघे तरुण अंघोळीसाठी गेले होते. दरम्यान ते नदीपात्रात बुडाले. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत बुडालेल्या दोघांचा शोध घेतला. अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. रविवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू केले. मात्र सायंकाळ पर्यंत बुडालेल्या तरुणांचा शोध लागलेला नव्हता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.