Chikhali : टेम्पो चोरणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – टेम्पो चोरणाऱ्या दोन आरोपींना चिखली पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून चोरीचा तीनचाकी टेम्पो जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे चिखली पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याची उकल झाली आहे.

आरमान इबनेहसन शाह (रा. कुदळवाडी, चिखली), धर्मींदर राजकुमार पासवान (वय 22, जाधववाडी, चिखली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली परिसरात पोलीस गस्त घालत असताना चोरीला गेलेला एक तीनचाकी टेम्पो (एम एच 14 / ई एम 2405) मोरेवस्ती येथे मोशीच्या दिशेने जाताना दिसला. यावेळी पोलिसांनी टेम्पोचा पाठलाग करत आरोपींना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे गाडीची कोणतीही कागदपत्रे मिळाली नाहीत. यावरून पोलिसांनी टेम्पो चालकाकडे चौकशी केली असता त्यांनी शुक्रवारी (दि. 19) शिवाजीनगर सेक्‍टर क्रमांक 16 प्राधिकरण येथून टेम्पो चोरल्याचे कबूल केले. या कारवाईत पोलिसांनी 75 हजार रुपयांचा तीन चाकी टेम्पो जप्त केला आहे.

ही कारवाई चिखली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे, पोलीस उपनिरीक्षक भरत चापाईतकर, मधुसुदन घुगे, पोलीस हवालदार नरेंद्र राजे, पोलीस नाईक आनंदा नागरे, संदीप राठोड, शंकर यमगर, विनोद जाधव, किशोर धनवडे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.