Budhwar Peth News : तिळगुळाच्या गोडव्यासह ‘ती’चाही मकरसंक्राती निमित्त सत्कार

एमपीसी न्यूज – गोडवा केवळ नातेवाईक, आप्तेष्टात वाढवायचा (Budhwar Peth News) नसतो; तो रंजल्या-गांजल्यामध्येही वाढवायचा असतो. या विचारातूनच खास मकरसंक्राती निमित्त रिलीफ फाउंडेशन देहविक्रय महिला लक्ष्यगट प्रकल्पातर्फे बुधवार पेठेतील  देहविक्री करणाऱ्या महिलांसाठीही खास कार्यक्रम घेण्यात आला.

महिलांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळावे, कुठल्याही प्रकारचा भेदभाव राहू नये व त्यांना कुटुंबासारखा आधार वाटावे ह्या उददे्शाने संस्थेचे प्रकल्प डायरेक्टर अनिल बोरकर यांनी महिलांना निरोगी राहण्यासाठी दिनचर्या कशी असावी, स्वतःची सुरक्षित काळजी कशी घ्यावी? या बद्दल मार्गदर्शन केले.

मंथन फाउंडेशनच्या प्रकल्प डायरेक्टर आशा भट यांनी महिलांनी जोखीमयुक्त काम करताना स्वत:ची काळजी कशी घ्यावी? यावर प्रबोधन केले. तसेच, या कार्यक्रमाला मदत फाउंडेशनचे संस्थापक अकबर शेख यांनी महिलांचे कौतुक केले आणि रिलीफ फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत म्हणाले, की या महिलांमुळे प्रत्येक घरातील मुली, महिला सुरक्षित आहेत.

Maharashtra Politics : महाराष्ट्रात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र; अखेर युती झालीच!

बुधवार पेठेतील गरजू देहविक्री करणाऱ्या महिलांना (Budhwar Peth News) आमची ‘मदत’ फाउंडेशन संस्था नक्की मदत करेल, असे आश्वासन देऊन बक्षीस म्हणून महिलांना ब्लँकेट देण्यात आले. महिलांना टी. बी. आणि रक्तातील बी. आणि सी. काविळ तपासणीचा लाभही देण्यात आला.

या कार्यक्रमाला गाडीखाना दवाखान्यातील टी. बी सेंटरच्या गीता परदेशी, ससून रुग्णालय आयसी. टी. सी.च्या प्रज्ञा माने आणि NVHCP च्या लॅब टेक्निशियन निलोफर मेटकरी तसेच रिलीफ संस्थेचे आरती आंग्रे, वर्षा गावडे, मोनिका बोरगे, कविता थोनगिरे, कांचन देसाई या सर्वांनी सहकार्य केले.

यावेळी अनिता उबाळे यांनी सुत्रसंचालन केले. कविता सुरवसे यांनी संस्थेची माहिती सांगून कार्यक्रमाला सुरुवात केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.