Maharashtra Politics : महाराष्ट्रात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र; अखेर युती झालीच!

एमपीसी न्यूज : राज्याच्या राजकीय घडामोडीत (Maharashtra Politics) मोठा बदल झाला आहे. आजतागायत एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे शिवशक्ती आणि भीमशक्ती अखेर एकत्र आले आहे. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी युतीची घोषणा केली आहे.

Pune News : विद्वत संमेलनात उलगडला संविधानाचा अन्वयार्थ

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली आहे. मुंबईत झालेल्या या पत्रकार परिषदेला शिवसेना ठाकरे गटाचे सुभाष देसाई, संजय राऊत, अरविंद सावंत तर वंचित बहुजन आघाडीकडून रेखा ठाकूर, अबुल खान उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.