Business News : श्री चामुंडा स्टोन शोरुममधून आणलेल्या टाइल्स, मार्बल, ग्रॅनाइट देतील तुमच्या बजेटमध्ये स्वप्नातील घराचा अनुभव

एमपीसी न्यूज – ‘घर’ हे घर असते. घराला कशाचीही सर येत नाही. म्हणूनच आपण आपल्या घरातील प्रत्येक बाजू आपल्या पसंतीने सजवतो. घर मोठे असो की लहान, आपल्याला आपल्या कल्पनेनुसार घर सजवायची इच्छा असते. तुमच्या गरजेनुसार आणि तुमच्या बजेटनुसार तुमचे घर सर्वात सुंदर बनवण्यासाठी श्री चामुंडा स्टोन्स तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. स्वप्नातील घर बनवणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि ‘श्री चामुंडा स्टोन्स’ येथे, आम्ही तुम्हाला ती दृष्टी प्रदान करण्यात मदत करतो. जिथे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आवडीच्या टाइल्स, मार्बल, ग्रॅनाइट आणि CP-सॅनिटरी फिटिंग्ज आणल्या नंतर तुमच्या स्वप्नातील घराचा अनुभव तुमच्या बजेट मध्ये घेता येईल.

श्री चामुंडा ग्रुप घरातील इंटेरियर आणि सुशोभीकरण करण्यासाठी आवश्यक मार्बल, टाइल्स, सीपीपीटी टाइल्स, ग्रॅनाईट या वस्तूंचे वितरक आणि विक्रेता म्हणून गेली 17 वर्ष पुण्यात कार्यरत आहे. घर शुशोभीकरणात घरातील विविध वस्तूंना विशेष महत्त्व असते. त्याचाच एक भाग म्हणजे घरातील टाईल्स, मार्बल, ग्रॅनाईट या वस्तू देखील घराच्या सौंदर्यात विशेष भर घालतात.

ग्राहकांना घराच्या इंटेरियर आणि सुशोभीकरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या घरातील वस्तू पुरवत श्री चामुंडा स्टोन शोरूमने हजारो ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. शोरूमच्या सेवेबद्दल बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार यांच्यासह इतर हजारो ग्राहक समाधान व्यक्त करतात.
घराच्या इंटेरियर संबंधित विश्वासार्ह, आधुनिक आणि ब्रॅण्डेड वस्तू ग्राहकांना पुरवण्याच्या दृष्टिकोनातून राकेश जैन यांनी ‘श्री चामुंडा स्टोन’ या शोरुमची 2004 साली स्थापना केली. ग्राहकांच्या गरजा आणि त्यानुसार उत्कृष्ट वस्तू व सेवा पुरवणे हे उद्दिष्ट ठेवून शोरूमची स्थापना करण्यात आली.

तसेच, येत्या काळातही हेच उद्दिष्ट ठेवून पुढील वाटचाल करण्यास कटिबद्ध असल्याचे राकेश जैन सांगतात. नाविन्यपूर्ण, ट्रेन्डी डिझाईन आणि उत्कृष्ट सेवा म्हणजे ‘श्री चामुंडा स्टोन’ हे सूत्र ग्राहक बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार, आर्किटेक्ट यांनी आता पक्कं केलं आहे. चामुंडा स्टोनचे शोरूम काळेवाडी येथे आहे.

श्री चामुंडा स्टोन्स
19/2, कोकणे पार्क, जगताप डेअरी जवळ, पिंपळे सौदागर, काळेवाडी, पिंपरी-चिंचवड, पुणे- 17
संपर्क – 9850417618 / 9552531408
वेबसाईट – chamundastones.in
ईमेल – [email protected]

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.