Marunji News : बिटकॉईन गुंतवणूकीतून फायद्याचे आमिष, इस्टेट ब्रोकरला 32 लाखांचा गंडा 

एमपीसी न्यूज – बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करुन अधिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत, रिअल इस्टेट ब्रोकरला तब्बल 32 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत मारुंजी येथे हा प्रकार घडला. 
याप्रकरणी रिअल इस्टेट ब्रोकर अतुल अरुण सावडिया (वय 42, रा. मारुंजी, मुळशी) यांनी शुक्रवारी (दि.04) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय व नंदिनी (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्यासह पाच ते सहा मोबाईल नंबर धारकांना विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सावडिया यांना आरोपींनी तयार केलेल्या व्हॉट्स ग्रुपमध्ये त्यांच्या परवानगी शिवाय समाविष्ट केले. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करुन अधिक फायदा मिळवून देण्याचे आमिष फिर्यादी यांना देण्यात आले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांना BINANCE LUN हे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगितले. त्यानंतर त्या ॲप्लिकेशनच्या वॉलेट मध्ये पैसे भरण्यास सांगितले व नफ्याची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी कमिशनची मागणी केली. सुरवातीला फिर्यादी यांनी 23 लाख 91 हजार रुपये दिले, पण आरोपींनी नफा मिळवून दिला नाही. असे एकूण 32 लाख 15 हजार रुपयांची फसवणूक सावडिया यांची झाली. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

https://youtu.be/E3jTgxKBl8g

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.