CA Result : सीए परीक्षेचा निकाल जाहीर; 24.98 टक्के उमेदवार उत्तीर्ण

एमपीसी न्यूज – अत्यंत कठीण समजल्या (CA Result) जाणाऱ्या सीए (चार्टर्ड अकाउंटंट / सनदी लेखापाल) परीक्षेचा निकाल आज (मंगळवारी, दि. 8) जाहीर झाला. 24.98 टक्के उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

सनदी लेखापाल परीक्षेसाठी एक लाख 17 हजार 68 उमेदवारांनी नोंदणी केली. त्यातील एक लाख तीन हजार 517 उमेदवारांनी परीक्षा दिली. ही परीक्षा 24, 26, 28 आणि 30 जून 2023 रोजी पार पडली. परीक्षा दिलेल्या उमेदवारांपैकी 25 हजार 860 उमेदवार पास झाले आहेत.

55 हजार 573 पुरुष उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यातील 14 हजार 448 उमेदवार उत्तीर्ण झाले. हे प्रमाण 25.99 टक्के एवढे आहे. तर 47 हजार 944 महिला उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यातील 11 हजार 412 उमेदवार उत्तीर्ण झाले. हे प्रमाण 23.80 टक्के एवढे आहे. महिलांपेक्षा पुरुष उमेदवारांचा निकाल 2.19 टक्के अधिक आहे.

PCMC : अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त 500 रोपणाचा संकल्प

पुणे केंद्रातून तीन हजार 317 उमेदवार परीक्षेला बसले (CA Result) होते. त्यातील 848 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पोस्टाने निकालाची प्रत मिळेल. पुढील चार ते पाच आठवड्यात पोस्टाने निकाल मिळाला नाही तर [email protected] यावर संपर्क करता येईल, असे इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.