Alandi : एमआयटी कनिष्ठ महाविद्यालातील सहा विद्यार्थ्यांचे सीए आणि सीएस परीक्षेत यशाचा झेंडा

एमपीसी न्यूज : आळंदी (Alandi) येथील एमआयटी कनिष्ठ महाविद्यालातील सहा विद्यार्थ्यानी द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया संस्थेने घेतलेल्या सीए आणि सीएस फाउंडेशन परीक्षेत पहिल्या प्रयत्नात यश संपादित केले.

यामध्ये जय पठारे, निशा बोराडे, ओम वाडेकर. सोहम जगनाडे आणि ऋतुज भांगे या विद्यार्थ्यानी सीए तर पूर्वा मोरे हिने सीएस परीक्षेत यश संपादित केले.

Chakan : पिंपळगाव येथून 1 हजार लिटर गावठी दारूचे रसायन जप्त

या यशाबद्दल माईर्स एमआयटी विश्वस्त . प्रा.स्वाती कराड – चाटे, शैक्षणिक प्रमुख डॉ. ज्योती जोतावानी यांनी यशस्वी विध्यार्थाना शुभेच्या दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदाशिव कुंभार, उपप्राचार्य डॉ. ओंकार इनामदार (Alandi) यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.वाणिज्य समन्वयक फुरकान कुमठे तसेच प्रा. प्रशांत शिशुपाल व प्रा. रिषभ कुमार यांचे मार्गदर्शन लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.