PCMC : अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त 500 रोपणाचा संकल्प

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) वतीने साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त 500 रोपणाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यापैकी 50 झाडांचे वृक्षारोपण नुकतेच करण्यात आले.

माजी नगरसेवक मारुती भापकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती अध्यक्ष अण्णासाहेब कसबे, कार्याध्यक्ष सचिन दुबळे, सचिव नितीन घोलप तसेच मनोज तोरडमल, संजय ससाणे, अरुण जोगदंड, दत्तू चव्हाण, डी.पी खंडागळे, गणेश साठे,विशाल कसबे, विठ्ठल कळसे, भानुदास साळवे, उद्यान विभागाचे नंदकुमार ढवळसकर, भाऊसाहेब सगरे, सिदेश्वर कडाळे, भागुजी बोकटे, सुरेश कोळेकर, उद्यान सहाय्यक सुरेश हुलावळे आदी उपस्थित होते.

Chinchwad : शहर पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने जयंती महोत्सवाच्या वेळी 500 झाडे लावण्याचा (PCMC) उपक्रम राबविण्यात यावा अशी मागणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब कसबे यांनी महापालिकेकडे केलेली होती. त्यास अनुसरून महापालिकेच्या उद्यान विभागाने 50 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले असून उर्वरित झाडेही लवकरच लावण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.