Cancer- Annual Horoscope 2021-2022: कर्क राशीच्या व्यक्तींना जास्त कष्ट व परिश्रम घ्यावे लागतील

एमपीसी न्यूज – जाणून घेऊयात कर्क राशीचे वार्षिक राशी भविष्य 2021-2022. कर्क राशीसाठी हे वर्ष कसे जाईल, याचे भाकित केले आहे नामवंत ज्योतिषी ज्योतिष भास्कर उमेश स्वामी यांनी!  

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

वार्षिक राशी भविष्य हा वाचकांचा प्रत्येकवर्षी दिवाळी अंकात आवडता विषय असतो. प्रत्येक दिवाळी अंकात राशी भविष्याचे स्थान असते असे दिसून येते. प्रत्येकाला आपल्या भविष्यात काय दडले आहे याची उत्सुकता असते. वास्तविक जोतिषशास्त्र हे गूढशास्त्र आहे.

आकाशात ग्रह व पृथ्वीवरील मानवी जीवन यांचासंबंध कसा काय हे ग्रह मनुष्याच्या आयुष्यावर कसा परिणाम करू शकतील. अशा प्रकारच्या शंका घेऊन त्यावर वाद विवाद करणारी पुष्कळ विद्वान मंडळीआपणास भेटली असतीलच. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रदृष्या ग्रहांचे परिणाम मानवी जीवनावर घडून येतात हीगोष्ट व त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणारे व्यक्ती हजारो आहेत. त्याही आपणास भेटल्या असतील.

यापूर्वी अनेक ऋषीमुनींनी अभ्यास करून त्यांच्या अंतर्ज्ञानाच्या शक्तीद्वारे पुराणात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या आपण प्रत्यक्षात अनुभवत आहोत. आधुनिकशास्त्रकार देखील ग्रहगोळांचा चुंबकीय आकर्षणाचा परिणाम पृथ्वीवरील प्राणी जीवनावर होत असतो, असे म्हणतात.

आचार्यांच्या प्राचीन 14 विद्यांपैकी ज्योतिषविद्या ही एक विद्या आहे. असो ह्या वर्षी प्रत्येक वर्षाप्रमाणे प्रत्येक राशीचे स्वभाव व नक्षत्रानुसारही विचार करून व प्रत्येक राशीचे गोचर प्रमुख ग्रहस्थितीचा अभ्यास करून वार्षिक राशीचे भविष्य लेखनकेळे असून त्याचबरोबर शुभरंग, उपाय, उपासना दिली आहे.

उपासना ही ग्रह गोचरीने प्रत्येक राशीला ग्रहाचे बलाबल पाहून दिली आहे. त्यांचा उपयोग आपणांस होईल, असे वाटते. इथे राशी भविष्य लिहत असताना फक्त गोचर ग्रह स्थितीचा विचार केला आहे. वाचकांनी एखाद्या ग्रहाची फलित हे फक्त गोचर ग्रह स्थितीवर नसते.

त्यासाठी मूळ जन्म पत्रिका, चालू महादशा, अंतर्दशा व तुमचे प्रारब्ध यांचा ही विचार करावा असे मला वाटते. येथे आपल्या चंद्रराशीकडून आम्ही फक्त ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा मानवी जीवनावर कसा कसापरिणाम होऊ शकतो याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत असतो.

– ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
(ज्योतिष व वास्तू सल्लागार)
केशवनगर, कासारवाडी, पुणे 411034.
मोबाईल – 9922311104.

(राशी  भविष्य पाहताना लग्न राशी, चंद्रराशी व रवि राशी यांचा विचार करावा. लग्न राशीवरून व्यक्तीमत्व विचारात घ्यावे. आरोग्यचा विचार करावा, चंद्र राशीवरून मानसिक सौख्य व रविराशी वरून नोकरी व्यवसाय व सामाजिक यांचा विचार करावा.)

कर्क : जास्त कष्ट व परिश्रम घ्यावे लागतील

कर्क राशी चक्रामधील चौथी रास असूनजलतत्वाची स्त्री स्वभावाची आहे. या राशीचास्वामी चंद्र आहे. प्रसन्नता व संवेदनशीलता हेगुण आढळतात. सतत विचारांची अदलाबदलहोते. त्यामुळे अत्यंत भावनाप्रधान ह्या राशीच्याव्यक्ती असतात.

या राशीचे चिन्ह खेकडा आहे.त्यामुळे आपल्या उद्दिष्ट व विचाराला चिकटून असतात. त्यामुळेसर्वांशी संबंध चांगले व मधूर असतात. संस्थेत, कार्यालयात,सामाजिक क्षेत्रात पूर्णपणे समर्पित होऊन काम करतात.

त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाची छाप दुसऱ्यांवर सहज पाडतात.लोकप्रियता, लोकसंग्रह करण्याची उत्तम कला यांना अवगत असते.क्षमाशीलता हा गुण असल्यामुळे सहसा शत्रू ह्या राशींना कमी असतात. नेतृत्व व अधिकारपद हे उत्तमरीत्या सांभाळतात. तरअशा सोज्वळ व्यक्तिमत्व असणाऱ्या कर्क राशींच्या व्यक्ती असतात.

कर्कराशीमध्ये पुनर्वसू, पुष्य व आश्लेषा ही नक्षत्रे येतात. कर्करास पुनर्वसू नक्षत्र असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव ईश्वरावर श्रद्धाअसणारी, स्वत:चे विचार मांडणारा, धर्मशील, कायदे पंडित यांचाआत्मविश्वासही चांगला असतो.

कर्क रास पुष्य नक्षत्र असणाऱ्याव्यक्तीं पाठ करणारे, बुद्धिमान, भाऊ बहिणीमध्ये लाडका असणारा,राजप्रिय, घरामध्ये एकत्र कुटुंबात राहणारा असतो. तर कर्क रासआश्लेषा या नक्षत्राचे व्यक्ती परिणामाची चिंता न करणारे काहीवेळा विश्वासू नसणारे, क्रोधी, कृतघ्न, धूर्त अनेक भाषांचे ज्ञानअसणारे, वैभवाची इच्छा करणारे, राजकारणी, साहसी, अभिमानी,स्वातंत्र्यप्रिय असतात. तर अशा कर्कराशीच्या व्यक्तीचे चालू वर्षकसे राहील ते पाहू…

कर्क राशीच्या अष्टमस्थानातून गुरुचे भ्रमण होत असून जास्तमेहनत घ्यावी लागेल. त्याचप्रमाणे स्त्रीवर्गाकडून फायदा, वारसाहक्कअचानक द्रव्यलाभ या गोष्टी दर्शवितात. विमा वडिलोपार्जित इस्टेट अशा मार्गातून पैसा मिळेल.

अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींना ध्यानधारणा, योग अभ्यास याबाबतीत शुभ फळे मिळतील. ज्योतिषी, कीर्तनकार यांना सूचक स्वप्ने, सदगुरुंची प्राप्ती होणेअशा घटना घडतील. व्यवसायातील व्यक्तींना संमिश्र फळे मिळेल.

कोणतेही काम करताना जास्तकाळ व परिश्रम घ्यावे लागतील.कर्क राशीच्या सप्तमातून शनिचे भ्रमण होत असून २९ एप्रिल२०२२ ते १२ जुलै २०२२ या कालखंडात अष्टमातून भ्रमणहोणार आहे. स्वराशीतच शनिचे भ्रमण होत असल्यामुळे कायदा,कोर्टकचेरी यातील कामे मार्गी लागतील. घराचे नूतनीकरणकराल. व्यवसायात स्थित्यंतरे दर्शवितात.

चालू व्यवसायात अथवा कामकाजात बदल घडेल, व्यवसायासाठी, नोकरीसाठी प्रवासवारंवार घडतील. या कालखंडात अधूनमधून नैराश्याची भावना येईल. जुन्या दुखण्याचा त्रास अधून मधून राहील.घरातील वातावरण असमाधानकारक राहू शकते. एकंदर शनिचे भ्रमण आपणास मिश्रफलदायी असून, ग्रहांचा जप व दान केल्यास प्रतिकूलता कमी होईल.

राह-केतूचे भ्रमण लाभ व पंचम स्थानातून. मार्च २०२२नंतर दशम व चतुर्थ स्थानातून होणार आहे. वर्षांच्या पूर्वार्धात व्यवहारातील प्रश्न अडचणी मार्गी लागतील. राजकीय, सरकारी व्यक्ती यांचे सहकार्य मिळून कामे मार्गी लागतील. उत्तरार्धात मोठी जबाबदारी स्वीकारावी लागेल.

नोकरीमधील बदली घरापासून दूरवर होईल. वरिष्ठांशी शाब्दिक मतभेद संभवतात. हर्षलचे भ्रमण दशमातून, नेपच्यूनचे भ्रमण अष्टमातून व प्लुटोचे सप्तमातून होत असून, प्रवासाचे योग येतील. स्वत:च्या आरोग्याबद्दलचे काही संकेत मिळतील. काही गोष्टी अचानक घडल्यामुळे त्याचा त्रास होणार नाही, याची दक्षता घ्या.

शुभरंग : पांढरा, आकाशी.

शुभदिनांक : कोणत्याही महिन्याच्या २, ११, २९.

भाग्यकारक वयोवर्षे : १२, १६, २१, ४८, ५९, ६६.

भाग्यरत्न : पुष्कराज रत्नाचा वापर करावा.

उपासना व उपाय : आपण शिवशंकर उपासना, गणपतीअथर्वशीर्ष वाचन केल्यास उत्तम राहील. त्याचबरोबर मंदिरातपिवळ्या वस्तू, हरभरा डाळ, हळकुंड अशा प्रकारच्या वस्तू दान कराव्यात. चांदीचा हत्ती देवघरात ठेवावा. धने, बदाम जल प्रवाहीत करणे. मंदिरात सफेद वस्तू दान करावे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.