Gemini – Annual Horoscope 2021-2022: मिथुन राशीच्या व्यक्तींना तीर्थयात्रेचा योग

एमपीसी न्यूज – जाणून घेऊयात मिथुन राशीचे वार्षिक राशी भविष्य 2021-2022. मिथुन राशीसाठी हे वर्ष कसे जाईल, याचे भाकित केले आहे नामवंत ज्योतिषी ज्योतिष भास्कर उमेश स्वामी यांनी!  

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

वार्षिक राशी भविष्य हा वाचकांचा प्रत्येकवर्षी दिवाळी अंकात आवडता विषय असतो. प्रत्येक दिवाळी अंकात राशी भविष्याचे स्थान असते असे दिसून येते. प्रत्येकाला आपल्या भविष्यात काय दडले आहे याची उत्सुकता असते. वास्तविक जोतिषशास्त्र हे गूढशास्त्र आहे.

आकाशात ग्रह व पृथ्वीवरील मानवी जीवन यांचासंबंध कसा काय हे ग्रह मनुष्याच्या आयुष्यावर कसा परिणाम करू शकतील. अशा प्रकारच्या शंका घेऊन त्यावर वाद विवाद करणारी पुष्कळ विद्वान मंडळीआपणास भेटली असतीलच. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रदृष्या ग्रहांचे परिणाम मानवी जीवनावर घडून येतात हीगोष्ट व त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणारे व्यक्ती हजारो आहेत. त्याही आपणास भेटल्या असतील.

यापूर्वी अनेक ऋषीमुनींनी अभ्यास करून त्यांच्या अंतर्ज्ञानाच्या शक्तीद्वारे पुराणात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या आपण प्रत्यक्षात अनुभवत आहोत. आधुनिकशास्त्रकार देखील ग्रहगोळांचा चुंबकीय आकर्षणाचा परिणाम पृथ्वीवरील प्राणी जीवनावर होत असतो, असे म्हणतात.

आचार्यांच्या प्राचीन 14 विद्यांपैकी ज्योतिषविद्या ही एक विद्या आहे. असो ह्या वर्षी प्रत्येक वर्षाप्रमाणे प्रत्येक राशीचे स्वभाव व नक्षत्रानुसारही विचार करून व प्रत्येक राशीचे गोचर प्रमुख ग्रहस्थितीचा अभ्यास करून वार्षिक राशीचे भविष्य लेखनकेळे असून त्याचबरोबर शुभरंग, उपाय, उपासना दिली आहे.

उपासना ही ग्रह गोचरीने प्रत्येक राशीला ग्रहाचे बलाबल पाहून दिली आहे. त्यांचा उपयोग आपणांस होईल, असे वाटते. इथे राशी भविष्य लिहत असताना फक्त गोचर ग्रह स्थितीचा विचार केला आहे. वाचकांनी एखाद्या ग्रहाची फलित हे फक्त गोचर ग्रह स्थितीवर नसते.

त्यासाठी मूळ जन्म पत्रिका, चालू महादशा, अंतर्दशा व तुमचे प्रारब्ध यांचा ही विचार करावा असे मला वाटते. येथे आपल्या चंद्रराशीकडून आम्ही फक्त ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा मानवी जीवनावर कसा कसापरिणाम होऊ शकतो याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत असतो.

– ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
(ज्योतिष व वास्तू सल्लागार)
केशवनगर, कासारवाडी, पुणे 411034.
मोबाईल – 9922311104.

(राशी  भविष्य पाहताना लग्न राशी, चंद्रराशी व रवि राशी यांचा विचार करावा. लग्न राशीवरून व्यक्तीमत्व विचारात घ्यावे. आरोग्यचा विचार करावा, चंद्र राशीवरून मानसिक सौख्य व रविराशी वरून नोकरी व्यवसाय व सामाजिक यांचा विचार करावा.)

मिथुन : तीर्थयात्रा होतील

मिथुन राशीचक्रातील तिसऱ्या क्रमांकाची रास असून द्विस्वभाव असून वायुतत्वाची व पुरुष स्वभावाची रास आहे. काम त्रिकोणामधील प्रथम क्रमांकाची रास असून ह्या राशीचा स्वामी बुध आहे. मिथुन रास ही बुद्धीजीवी रास असून. तीव्र स्मरणशक्ती, समयसूचकता, बैठका, चर्चासत्रे यांमध्ये चातुर्य,थोडीशी चंचलता, जनसंपर्काचे व्यवसाय, बौद्धिक कौशल्यक्षेत्रातील व्यक्ती या राशीचे जास्त करून आढळतात.

अभ्यासू वृत्ती,बोलण्यावर वर्चस्व, साहित्य, काव्य क्षेत्रात यांचा हातखंडा असतो.कार्यक्षमता उत्तम असून नवनवीन विचारांची बैठक उत्तम असते.

मिथुन राशीमध्ये मृग, आर्द्रा व पूनर्वसू ही नक्षत्रे येतात. मिथुन रास मृग नक्षत्र यामध्ये व्यक्तीचा स्वभाव धार्मिक यात्रा, धनयुक्त, साहसी, विवेकी, वाहन व भूमी यांचा उपयोग प्राप्त करणारी असते. तसेच हशार, विद्वान, गतीशील, उत्साही व पराक्रमीअसते. तर मिथुन रास आर्द्रा नक्षत्रामधील व्यक्ती उग्र स्वभावाची,चंचल मनाची, क्रोधी, संशयी असतात.

हे लोक हिंसक, कृतघ्न,स्वभावात कठोरपणा व गूढ विद्येची आवड व बुद्धी तीक्ष्ण असते. तर मिथुन रास पुनर्वसू नक्षत्रामधील व्यक्ती व्यवहार कुशलता, विद्वान व कोमल, माणुसकी जाणणारा, साहित्यप्रेमी, सौम्य व संतोषयुक्त मनाचा, कला-कौशल्य संपन्न, लोकसेवा करणारी, ईश्वरभक्त, गायन कलेत पारंगत अशा गुणांनी युक्‍त असतात. तर अशा मिथुन राशीच्या व्यक्तींचे चालू वर्ष कसे राहील ते पाहू…

राशीच्या भाग्यस्थानातून होणारे गुरुचे भ्रमण मनाला दिलासादेणाऱ्या घटना घडतील.उच्चशिक्षणासाठी पूरककाळ दर्शवितो. तीर्थयात्रा, पुण्यकर्म, सत्कर्म हातून होतील. धार्मिक कार्य,गुरुजनांचा सहवास लाभेल. सामाजिक संस्था, धार्मिक संस्थायाठिकाणी विश्वस्त म्हणून निवड होईल.

परदेशगमन अथवा काहीकाळ परदेशात नोकरी करण्याचे योग दर्शवितात. व्यवसायातवाढ व वृद्धी करण्यासाठी कालखंड चांगला आहे. एकूणच मागीलवर्षापेक्षा हे वर्ष नवीन उमेद घेऊन येणारे राहिल.

राशीच्या अष्टम स्थानातून शनिचे भ्रमण होत असून व २९ एप्रिल २०२२ ते १२ जुले २०२२ या कालखंडात आपल्याभाग्यस्थानातून शनिचे भ्रमण होणार आहे. बराच काळ प्रतिकूल परिस्थितीतून जात होता. आता त्यातून बाहेर पडण्यासाठी हेशनिचे भ्रमण अनुकूल राहील.

वैवाहिक समस्या, कोर्टकचेरी,नोकरी व्यवसायातील अडचणी आता कमी होतील हे निश्‍चित.हळूहळू आर्थिक स्थिती सुधारेल. पुढील कायदेशीर कामामध्ये दक्ष राहण्याचा हा आमचा सल्ला. काही वेळ गैरसमज होण्याची शक्‍यता राहील.

वडिलोपार्जित प्रॉपर्टीची कामे सहमतीने मार्गी लागतील.नोकरी व्यवसायात चांगले बदल होतील. मात्र त्याचबरोबर कष्ट वश्रम वाढविणारा कालखंड राहील. विद्यार्थ्यांना कष्टातून यश मिळवावे लागेल.

राशीच्या व्यय व षष्ठ स्थानातून व मार्च २०२२ नंतर लाभव पंचम स्थानातून राहू केतूचे भ्रमण होणार आहे. त्यादृष्टीनेअनावश्यक खर्च टाळावेत. चीज वस्तूंची काळजी घ्यावी. प्रवासातकाळजी घ्यावी. हितशत्रूवर विजय मिळेल.

मित्रांपासून मनस्ताप होईल. कलाकार, खेळाडूंना अपेक्षेप्रमाणे यश कमी संभवते. हर्षलचे भ्रमण लाभस्थानातून व नेप्च्यूनचे भ्रमण भाग्यातून व प्लुटो अष्टमस्थानातून होत असून उपासना, योग, ध्यान यातून आनंद मिळेल.

शुभरंग : चमकदार पोपटी, फिकट गुलाबी.

भाग्यरत्न : पाचू हे रत्न वापरल्यास उत्तम राहिल.

शुभदिनांक : कोणत्याही महिन्याच्या ५,१४, २३.

भाग्यकारक वयोवर्षे : १७,२३,३५,४४,५३,६२.

उपासना व उपाय : आपण राधाकृष्ण व विष्णू उपासनाकेल्यास उत्तम राहिल. त्याचबरोबर बुधवारी व शनिवारी आख्खेउडीद नदीच्या पाण्यात सोडावे. चामड्याच्या वस्तू दान कराव्यात.गरीब लोकांना अन्नदान करावे. समुद्रामध्ये नारळ अर्पण करावे.गरीबांना अर्थसहाय्य करावे. मंदिरात सफेद वस्तू दान कराव्यात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.