Taurus – Annual Horoscope 2021-2022: वृषभ राशीच्या व्यक्तीं;च्या नोकरी-व्यवसायात मनासारख्या घटना घडतील

एमपीसी न्यूज – जाणून घेऊयात वृषभ राशीचे वार्षिक राशी भविष्य 2021-2022. वृषभ राशीसाठी हे वर्ष कसे जाईल, याचे भाकित केले आहे नामवंत ज्योतिषी ज्योतिष भास्कर उमेश स्वामी यांनी!  

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

वार्षिक राशी भविष्य हा वाचकांचा प्रत्येकवर्षी दिवाळी अंकात आवडता विषय असतो. प्रत्येक दिवाळी अंकात राशी भविष्याचे स्थान असते असे दिसून येते. प्रत्येकाला आपल्या भविष्यात काय दडले आहे याची उत्सुकता असते. वास्तविक जोतिषशास्त्र हे गूढशास्त्र आहे.

आकाशात ग्रह व पृथ्वीवरील मानवी जीवन यांचासंबंध कसा काय हे ग्रह मनुष्याच्या आयुष्यावर कसा परिणाम करू शकतील. अशा प्रकारच्या शंका घेऊन त्यावर वाद विवाद करणारी पुष्कळ विद्वान मंडळीआपणास भेटली असतीलच. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रदृष्या ग्रहांचे परिणाम मानवी जीवनावर घडून येतात हीगोष्ट व त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणारे व्यक्ती हजारो आहेत. त्याही आपणास भेटल्या असतील.

यापूर्वी अनेक ऋषीमुनींनी अभ्यास करून त्यांच्या अंतर्ज्ञानाच्या शक्तीद्वारे पुराणात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या आपण प्रत्यक्षात अनुभवत आहोत. आधुनिकशास्त्रकार देखील ग्रहगोळांचा चुंबकीय आकर्षणाचा परिणाम पृथ्वीवरील प्राणी जीवनावर होत असतो, असे म्हणतात.

आचार्यांच्या प्राचीन 14 विद्यांपैकी ज्योतिषविद्या ही एक विद्या आहे. असो ह्या वर्षी प्रत्येक वर्षाप्रमाणे प्रत्येक राशीचे स्वभाव व नक्षत्रानुसारही विचार करून व प्रत्येक राशीचे गोचर प्रमुख ग्रहस्थितीचा अभ्यास करून वार्षिक राशीचे भविष्य लेखनकेळे असून त्याचबरोबर शुभरंग, उपाय, उपासना दिली आहे.

उपासना ही ग्रह गोचरीने प्रत्येक राशीला ग्रहाचे बलाबल पाहून दिली आहे. त्यांचा उपयोग आपणांस होईल, असे वाटते. इथे राशी भविष्य लिहत असताना फक्त गोचर ग्रह स्थितीचा विचार केला आहे. वाचकांनी एखाद्या ग्रहाची फलित हे फक्त गोचर ग्रह स्थितीवर नसते.

त्यासाठी मूळ जन्म पत्रिका, चालू महादशा, अंतर्दशा व तुमचे प्रारब्ध यांचा ही विचार करावा असे मला वाटते. येथे आपल्या चंद्रराशीकडून आम्ही फक्त ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा मानवी जीवनावर कसा कसापरिणाम होऊ शकतो याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत असतो.

– ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
(ज्योतिष व वास्तू सल्लागार)
केशवनगर, कासारवाडी, पुणे 411034.
मोबाईल – 9922311104.

(राशी  भविष्य पाहताना लग्न राशी, चंद्रराशी व रवि राशी यांचा विचार करावा. लग्न राशीवरून व्यक्तीमत्व विचारात घ्यावे. आरोग्यचा विचार करावा, चंद्र राशीवरून मानसिक सौख्य व रविराशी वरून नोकरी व्यवसाय व सामाजिक यांचा विचार करावा.)

वृषभ : नोकरी व्यवसायात मनासारख्या घटना घडतील

राशीचक्रातील वृषभ रास ही दुसरी असून राशीचा स्वामी शुक्र असून पृथ्वीतत्वाची व स्थिर प्रकृतीची रास आहे. स्त्री स्वभावाची आहे. साधारणत: प्रसन्न वृत्तीची, मधुर बोलणे,शांत, धीम्या वृत्तीचा, आनंदी स्वभावाची, कामाविषयी आवड असणारी, मित्र-मैत्रीणीच्यासंगतीमध्ये रमणारी. प्रेम व सौंदर्य ह्यांमधून आनंद मिळविणारी,गोड बोलून आपले काम साध्य करून घेणारी. कला, नाटक, नाट्यह्यांची आवड असणारी. जुन्या परंपरा तडजोडीची भूमिका घेणारी,प्रवासाची आवड असणारी. खर्चिक, संसारप्रिय, मित्रमंडळींमध्ये प्रिय असते.

वृषभ राशीमध्ये कृत्तिका, रोहिणी व मृग ही नक्षत्रेयेतात. वृषभ रास कृत्तिका नक्षत्राचा जातक आर्थिक सुबकता असणारा चतुर विद्यागुणयुक्त, स्वाभिमानी, राजेशाहीची आवड असेसाहसी, दुसऱ्याचे कौतुक करणारे व गर्विष्ठ व हट्टी असते. तर वृषभ रास रोहिणी नक्षत्रातील व्यक्ती मधुर वचनी, पवित्र आचरण, खरे बोलणारे, शांत, सत्वगुणी, स्थिर बुद्धी, सौंदर्य व आकर्षकव्यक्तिमत्व असते.

ही माणसे विलासी, श्रीमंत, व्यापारी व प्रेमळ असतात. काही व्यक्ती कलावंत असतात. वृषभ रास मृग नक्षत्राच्या व्यक्ती चंचल, उत्साही, भित्र्या, वाहन यांचे सुख भोगणारी असतात.या नक्षत्राच्या व्यक्तींना काही वेळा शेती खूप आवडते. तर वृषभ राशीचे चालू वर्ष कसे राहील ते पाहू.

राशीच्या दशम स्थानातून गुरुचे भ्रमण होत असून सामाजिक वराजकीय क्षेत्राम्ये अधिकारात वाढ होईल. कौटुंबिक प्रश्न सुटतील. राहत्या घराचा प्रश्न सुटेल. नवीन वास्तू अथवा वास्तुमधील दुरुस्ती ह्यावर्षी त्याची शक्‍यता असेल.

नोकरीमध्ये बदलीचे योग आहेत. नोकरीमध्ये दर्जा वाढणे, परदेशगमन यासारख्या घटना दर्शवितात. मित्रमंडळींकडून फायदा होईल. व्यावसायिक व्यक्तींनाविशेष फायदा करून देणारे वर्ष राहील. वडीलोपार्जित संपत्तीचावाटा यासारख्या गोष्टीचे प्रश्न सुटतील.

ज्यांचे शिक्षण पूर्ण होतआहे किंवा झाले आहे त्यांना लगेच नोकरीच्या संधी प्राप्त होतील.आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.शनिचे भ्रमण आपल्या भाग्यस्थानातून होत असून व २९ एप्रिल२०२२ ते १२ जुले २०२२ या काळात शनिचे भ्रमण दशमातूनहोणार असून त्याची फल शुभदायक राहतील.

नोकरीत स्थलांतर संभवतात. यशाकडे वाटचाल सुरु होईल. व्यवसायात अपेक्षित व सुखद बदल होतील. आर्थिक स्वास्थही सुधारेल. दीर्घकाळ रखडलेली महत्वाची कामे मार्गी लागतील. ज्येष्ठव्यक्तींकडून मदत व मार्गदर्शन मिळेल. सरकारी कामामध्ये यशमिळेल.

शेती, उद्योगधंदा, राजकारण क्षेत्रात असणाऱ्या व्यक्तींना हे शनिचे भ्रमण सुसहाय्य राहील. राहू-केतूचे भ्रमण लग्न व सप्तमातून होत असून मार्च २०२२ नंतर आपल्या व्यय व षष्ठ स्थानातून होणार आहे. त्यामुळे मानसिक द्विधा अवस्था राहील. मोठे निर्णय घेताना ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेणे योग्य राहील.

दूरवरच्या प्रवासामध्ये फसवणुकीचे योग अथवा अडचणी उद्‌भवतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. हर्षलचे भ्रमण व्ययस्थानातून नेपच्यूनचे भ्रमण दशमातून व प्लूटोचे भ्रमणभाग्यातून होत असून सामाजिक कार्यक्रमात आपली प्रतिष्ठा वाढेल.विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, तंत्रज्ञानामध्ये यश मिळेल.

शुभरंग : हिरवा, पांढरा

भाग्यरत्न : नीलम, डायमंड या रत्नाचा वापर केल्यास उत्तमराहील.

शुभदिनांक : कोणत्याही महिन्याच्या ६, १५, २४.

भाग्यकारक वयोवर्षे / १७, २८, ३५, ४४, ५३.

उपासना : आपण महालक्ष्मी उपासना, हनुमान चालीसा यांचे वाचन करावे. त्याचबरोबर गळ्यात चांदी वापरावी. बहिण व लहान मुलास आनंदी ठेवावे. हरभरा डाळ, गूळ मंदिरात दान द्यावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.