Bhosari : आंबेनळी दरीत गाडी कोसळून झाडात अडकली; चालक सुखरूप.

एमपीसी न्यूज – भोसरी येथे राहणा-या तरूणाची चारचाकी दरीत कोसळून झाडात अडकल्याची घटना शनिवारी (दि.20) सकाळी साडेदहा च्या सुमारास आंबेनळी घाटात घडली. सुदैवाने चालक सुरक्षित असून त्यांच्यावर महाड येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रशांत राजेंद्र सस्ते (वय 28 रा.भोसरी) असे जखमी वाहनचालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी येथे राहणारे प्रशांत सस्ते हे पोलादपूर कडून महाबळेश्वर च्या दिशेने त्यांच्या बीएमडब्लू कारने जात होते.  आंबेनळी घाटात दाभीळ गावच्या हद्दीत पोहचल्यावर त्यांची कार दाभीळ टोक या पॉईंट पासून 1 किलोमीटर अंतरावरच्या वळणावर 50 फुट खोल दरीत पडली व एका झाडात अडकली.

चालक राजेंद्र यांना जास्त दुखापत झाली नसून  त्यांना प्राथमिक उपचाराकरीता महाड येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकाची प्रकृती ठीक होताच अपघात कसा घडला याबाबत त्यांच्याकडे पोलिस
अधिक चौकशी करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.