Nigdi : दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कार व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी कार चालकाविरोधात गुरुवारी (दि.11) निगडी (Nidhi) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय गुलाब सरोदे (वय 42, रा.शिरगाव) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव असून कार (एमएच 12 पीएच 3497) याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी रामचंद्र शंकर कांबळे (वय 45, रा.देहुरोड) यांनी फिर्याद दिली आहे.

Hinjawadi : ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे त्यांचा मेहुणीचा मुलगा विजय हा त्यांच्या पत्नीसह शिवाजीनगरला जात होते. यावेळी पवळे ब्रीजवर संबंधीत बलेनो कारचालकाने त्याच्या ताब्यातील कारचा विजय यांच्या दुचाकीच्या हॅन्डलला धक्का दिला.यात वियज हे गाडीवरून खाली पडले व त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. हा अपघात 12 जून रोजी झाला होता. अपघातानंतर विजय यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले होते. त्यांचा उपचारादरम्यान 16 जून रोजी मृत्यू झाला. यावरून निगडी पोलीस (Nigdi) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.