Kasarwadi : घराजवळ पार्क केलेली कार जळून खाक

एमपीसी न्यूज – घराजवळ पार्क केलेल्या कारला आग लागली. यामध्ये कार पूर्णपणे जळून खाक झाली. तर अन्य एका कारला आगीची झळ लागली आहे. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी अडीचच्या सुमारास गोयल कॉम्प्लेक्स नाशिक फाटा कासारवाडी येथे घडली.

घराशेजारी पार्क केलेल्या कारने अचानक पेट घेतला. याबाबत अग्निशमन दलाला माहिती मिळताच संत तुकाराम नगर अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. परंतु यामध्ये एक कार पूर्णतः जळून खाक झाली तर त्याशेजारी असलेल्या कारला आगीची झळ लागल्याचे दुस-या कारचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.