Chinchwad : पालकत्वाची जबाबदारी योग्य रीतीने निभावणे हे कौशल्याचे काम – डॉ. संजीवकुमार पाटील

एमपीसी न्यूज – पालकत्व हे काही सोपे काम नाही, पालकत्व स्वीकारणं हे महत्त्वाची जबाबदारी आहे, ही जबाबदारी योग्य रीतीने निभावणे, हे एक कौशल्याचे काम आहे, असे मत अभिनेते व भूलतज्ज्ञ डॉ. संजीवकुमार पाटील यांनी पालकत्वाची पाठशाळा या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

Maval : पसायदान विश्वदीप कृती समितीच्या अध्यक्षपदी भास्करराव म्हाळसकर

ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल (Chinchwad ) स्कूलमध्ये शनिवारी (दि.22) पालकत्वाची पाठशाळा भरविण्यात आली होती.  याप्रसंगी  डॉक्टर,  अभिनेते व व्याख्याते डॉ. संजीव कुमार पाटील, शाळेचे व्यवस्थापक डॉ. स्वप्नाली धोका व डॉ. ललित कुमार धोका मुख्याध्यापिका विदयुत सहारे उपस्थित होते. डॉ. धोका यांनी डॉ. संजीव कुमार पाटील यांचा परिचय दिला. शाल, भेटवस्तू व भेटकार्ड देऊन सरांचे स्वागत करण्यात आले.

पालकत्वाची पाठशाळेचा प्रमुख विषय मोबाईल व्यसनमुक्ती आणि स्मार्ट पालकत्व होता. सर्वात प्रथम संजीव कुमार पाटील सर यांनी पालकांना ध्यानस्थ बसवून राष्ट्र प्रार्थना व पालकत्वाची प्रार्थना घेऊन संबोधित केले. विद्यार्थ्यांना मोबाईल न देता काय करावे,  आपल्या वागणुकीचा विद्यार्थ्यावर कसा परिणाम होतो व विद्यार्थ्यांची एकाग्रता कशी वाढवता येऊ शकते याविषयी दैनंदिन जीवनातील उदाहरण देत विनोदी प्रकारे पालकांना समजावून सांगितले.

उपस्थित पालकांनी या पाठशाळेचा भरभरून हसत लाभ घेतला. हि पाठशाळा दोन गटात घेण्यात आली. प्रथम गटात इयत्ता चौथी ते नववी चे पालक उपस्थित होते. दुसऱ्या गटात पूर्व प्राथमिक ते इयत्ता तिसरीचे पालक उपस्थित होते.

पाठशाळेचे सूत्रसंचालन शोभा मॅडम, लाईव्ह प्रक्षेपण स्वाती. व्ही. के आणि कार्यक्रमाची सांगता पूनम शेलकर यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.