Talegaon : चातुर्मासानिमित्त तळेगाव येथील श्री. शांती जैन मंदिरात धर्मचक्र आराधना  

एमपीसी न्यूज – चातुर्मासानिमित्त जैन बांधवांत उपासना, पूजा, उपवास असे विविध उपक्रम राबविले ( Talegaon ) जातात. तळेगाव दाभाडे येथील श्री शांती जैन मंदिरात धर्मचक्र आराधना उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 82 दिवसाचे उपवास सुरु करण्यात आले असून 1 दिवस उपवास 1 दिवस बियासणा ,आराधना व तप असे कार्यक्रम आयोजीत केले आहेत.

या कालावधीत परमपुज्य मुनी श्री हरिसागरजी म.सा., पुज्य श्री बालामुनी विरभद्रसागरजी म.सा. तसेच प्रभाविका परम पुज्य साध्वीजी श्री नभिवर्षाश्रीजी, म.सा. साध्वीजी श्री नेहावर्षाश्रीजी म.सा., साध्वीजी श्री नीतवर्षाश्रीजी म.सा., साध्वीजी श्री भक्तीवर्षाश्रीजी म.सा., साध्वीजी श्री हीववर्षाश्रीजी म.सा. यांचे प्रवचन असणार आहे.

Maval : पसायदान विश्वदीप कृती समितीच्या अध्यक्षपदी भास्करराव म्हाळसकर

या मंदिरात 40 ते 50 जण तप आराधना करत असून रोज सकाली व्याख्यान दुपारी गाथा पाठांतर, रात्री युवकांसाठी प्रवचन सुरु आहे. तसेच रोज सकाळी संक्रसंतव अभिषेक मंदिरात सुरु असणार आहे.

यासाठी स्टेशन श्री जैन सकल संघ, श्री नूतन ट्रस्ट मंडळ, श्री धर्मनाथ जैन युवक मंडळ, श्री ऋषभशांती सेवा ग्रुप यांच्या सहाय्याने हा उपक्रम राबवला जात आहे, अशी माहिती श्री शांतीनाथ आदिनाथ जैन ट्रस्ट मंडळातर्फे देण्यात आली ( Talegaon ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.