Chinchwad : चिंचवड परिसरातील ट्रान्सफॉर्मर, विद्युत डिपी परिसरातील गवत, वेली काढा

एमपीसी न्यूज – शहरात गेल्या पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. पावसाळी (Chinchwad) वातावरणामुळे चिंचवड, काळभोरनगर मोहननगर, रामनगर, विद्यानगर, महात्मा फुलेनगर आदी परिसरातील ट्रान्सफार्मर, विद्युत डिपी परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. या वाढलेल्या गवतामुळे शाॅर्ट सर्किट होऊन वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे ट्रान्सफार्मर, विद्युत डिपी परिसरातील गवत, वेली तत्काळ काढून घ्याव्यात, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल बाळासाहेब काळभोर यांनी केली आहे.

याबाबत विशाल काळभोर यांनी महावितरणच्या देशपांडे मॅडम यांना निवेदन दिले आहे. काळभोर यांनी निवेदनात म्हटले आहे की, चिंचवड, काळभोरनगर मोहननगर, रामनगर, विद्यानगर, महात्मा फुलेनगर आदी परिसरातील ट्रान्सफार्मर परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे.

Chinchwad : पालकत्वाची जबाबदारी योग्य रीतीने निभावणे हे कौशल्याचे काम – डॉ. संजीवकुमार पाटील

या वाढलेल्या गवतामुळे शाॅर्ट सर्किट होऊन वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. तसेच या भागातील काही रस्त्यावर (Chinchwad) महावितरणचे विद्युत डिपी आहेत. या डिपीवरही मोठ्या प्रमाणात वेली चढल्या आहेत. त्यामुळे पाऊस थांबताच ट्रान्सफार्मर आणि विद्युत डिपी परिसरातील गवत, वेली तत्काळ काढून घेण्यात यावी, अशी मागणी काळभोर यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.