Chikhali Crime : महिलेशी गैरवर्तणूक व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या घरमालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : महिलेशी गैरवर्तणूक करत तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Chikhali Crime) हा प्रकार चिखलीतील मोरेवस्ती येथे मंगळवारी (दि.30 ऑगस्ट) सकाळी नऊच्या सुमारास घडला.

याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून घरमालक  (वय 45) व त्याचा 16 वर्षाचा अल्पवयीन मुलगा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Yewale Amruttulya : बप्पांच्या मनातल” या उपक्रमातुन 10 दिवस सामाजिक जागरूकता  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आरोपीच्या घरात भाड्याने राहतात. फिर्यादी व घरमालकाच्या बायको सोबत भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून आरोपी व त्याचा मुलगा हे फिर्यादी जवळ आले व त्यांनी फिर्यादीला मारहाण करत साडीचा पदर ओढत धक्काबुक्की केली.( Chikhali Crime) तसेच अल्पवयीन मुलगा याने फिर्यादीला गळा दाबून मारून टाकण्याची धमकी दिली. यावरून चिखली पोलीस ठाण्यात विनयभंग व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.