Sangvi : भारतीय विद्यानिकेतन व लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा

एमपीसी न्यूज – दिवंगत माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या अनुषंगाने जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

यानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे फायदे समजावून सांगितले. यावेळी सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव,  मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे-पाटील, भटू शिंदे आदी उपस्थित होते.
 आरती राव म्हणाल्या, सतत मोबाईल गेम किंवा सोशल साईटमुळे मुलांना विचार करण्यासाठी अवांतर वेळ मिळत नाही. मात्र, विद्यार्थ्यांनी वेळ काढून वाचनाशी जोडून घेण्याची गरज आहे. यासाठी मुलांनी सतत विविध विषयावरील पुस्तकांचे वाचन करावे. वाचनाची आवड निर्माण करणे, हा काही एका दिवसाचा उपक्रम असू शकत नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक, सातत्याने प्रयत्न करावे लागतात. तसेच कुणालाही भेट देताना जाणीवपूर्वक पुस्तकांचीच निवड करावी. व्यक्तिमत्त्वविकासासाठीही वाचनाची अत्यंत आवश्‍यकता असते. कोणत्याही थोर व्यक्‍तिमत्त्वाचे चरित्र वाचले, तर त्यांच्या जडणघडणीत आई, वडील व शिक्षकांबरोबर वाचलेली पुस्तके हा महत्त्वाचा घटक असतो. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांनी अनेकांना प्रेरणा दिली आहे. वाचनाचा चांगला संस्कार विद्यार्थिदशेतच व्हायला हवा, असेही आरती राव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.