Chakan : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तसेच तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चाकण येथे घडली.

याप्रकरणी 21 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या 52 वर्षीय वडिलांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 6) सकाळी 11 च्या सुमारास फिर्यादी, त्यांची पत्नी आणि पीडित मुलगी असे तिघेजण त्यांच्या घराच्या  बाल्कनीमध्ये थांबले होते. त्यावेळी आरोपीने पीडित मुलीला हातवारे केले. त्यानंतर पीडित मुलीने आरोपी मागील दोन महिन्यांपासून आपला पाठलाग करत  असल्याचे घरच्यांना सांगितले.

यावरून फिर्यादी आणि त्यांच्या घरातील लोकांनी आरोपी तरुणाला धरून पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना आरोपीने फिर्यादी यांच्या मुलास जीवे मारण्याची धमकी दिली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.