Chakan : व्यावसायिकाचे अपहरण करून मागितली एक कोटींची खंडणी

एमपीसी न्यूज – व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास व्यावसायिकाला आणि त्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवार (दि. 21) ते शनिवार (दि. 23) या कालावधीत खेड तालुक्यातील शिरोली येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

Chinchwad : कोयत्याच्या धाकाने एकास लुटले; दोघांना अटक

आकाश विनायक भुरे (वय 22, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह शुभम सरोदे, अजय येलोटे, सोहेल पठाण, पन्या गोसावी (पूर्ण नावे माहिती नाही) आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चाकण येथील एका उद्योजकाने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गुरुवारी रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास आळंदी फाटा येथून एकतानगर चाकण येथे घरी जात होते. त्यावेळी आरोपी रिक्षातून आले. त्यांनी फिर्यादी यांच्या गाडीला रिक्षा आडवी लावून फिर्यादीस अडवले. त्यांच्या गाडीची चावी आणि मोबाईल फोन घेऊन त्यांना जबरदस्तीने रिक्षात बसवून शिरोली येथील एका शेतात नेले. रात्री साडेअकरा ते साडेबारा वाजताच्या कालावधीत त्यांना शेतात डांबून ठेवले.

‘तुझा मोठा व्यवसाय आहे. तुला आम्हाला एक कोटी रुपये द्यावे लागतील. तरच तुला सोडू नाहीतर तुझी व तुझ्या घरच्यांची गेम करू. उडवून टाकू’ असे म्हणत फिर्यादी यांच्या पायावर शस्त्र ठेऊन त्यांना धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीच्या बॅग मधून जबरदस्तीने 20 हजार रुपये काढून घेतले. ‘दोन दिवसात कमीत कमी 12 लाख रुपये दिले नाही तर तुला व तुझ्या घरच्यांना संपवून टाकू’ अशी धमकी देऊन फिर्यादीस सारा सिटी येथे दुचाकीवरून आणून सोडले. त्यानंतर वारंवार फोन करून पैशांची मागणी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.