Chakan : कंटेनरची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील दोघी बहिणी ( Chakan)  गंभीर जखमी झाल्या. त्यातील एका बहिणीचा त्यात मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 8) सकाळी साडेसात वाजता चाकण-शिक्रापूर रोडवर मेदनकरवाडी येथे घडली.

जनार्दन दहारी माझी (वय 37, रा. बिहार) असे गुन्हा दाखल झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी जखमी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Pune Metro : दोन शहरांदरम्यान वेळ वाचवणारी पण शहरांतर्गत प्रवासाचा वेळ वाढवणारी मेट्रो

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची बहिण त्यांच्या दुचाकीवरून चाकण -शिक्रापूर रोडने जात होत्या. मेदनकरवाडी येथे भरधाव वेगात आलेल्या एका कंटेनरने फिर्यादी यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली.

त्यात फिर्यादी आणि त्यांची बहिण गंभीर जखमी झाल्या. त्यातच त्यांच्या बहिणीचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर आरोपी कंटेनर चालक माझी कंटेनर सोडून ( Chakan)  पळून गेला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.