Chakan Crime News : सुरक्षारक्षकाला चाकूचा धाक दाखवून कंपनीत दरोडा ; चार आरोपींना अटक

एमपीसी न्यूज – कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून ॲल्युमिनियम उत्पादनासाठी लागणाऱ्या सुट्टे भाग चोरुन नेल्याची घटना रविवारी (दि.23) रात्री साडे दहाच्या सुमारास सावरदरी, खेड याठिकाणी तौरॉल इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीत हा प्रकार घडली. याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.

ईश्वर ओमकार राठोड (वय 31, रा. भांबोली ता. खेड, मुळगाव, जामनेर, जळगाव), लखन सुरेश अवचिते (वय 33, रा. मोशी, मुळगाव सावरगाव, ता. जामखेड, अहमदनगर), निपूर निवारण दास (वय 33, रा. गवतेवस्ती, आळंदीफाटा, ता. खेड, मुळगाव आसाम), शिशपाल जगदीश प्रसाद (वय 36, रा. आळंदी फाटा, ता. खेड, उत्तराखंड), अशी अटक आरोपींची नावे आहेत. तसेच फरार झालेल्या आणखी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शौनक आशिष रॉय (वय 38, रा. बो-हाडेवाडी, मोशी, मुळगाव – पश्चिम बंगाल) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रविवारी (दि.23) रात्री साडे दहाच्या सुमारास सावरदरी, खेड याठिकाणी तौरॉल इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीत घुसले. त्यानंतर सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने पकडून ठेवले व आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

आरोपींनी ॲल्युमिनियम उत्पादनासाठी लागणाऱ्या सुट्टे भाग एका गाडीत भरुन चोरुन नेले. पोलिसांनी चार आरोपी व गाडीसह चोरलेला मुद्देमाल जप्त केला. इतर दोन आरोपी फरार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.