Chakan Crime News : विद्यार्थ्याला आठ जणांकडून मारहाण

एमपीसी न्यूज –  काही कारण नसताना गावातील आठ ते नऊ जणांनी 19 वर्षीय विद्यार्थ्यांला (Chakan Crime News) लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी केले आहे. हा प्रकार चाकण जवळील दत्तवाडी येथे मंगळवारी (दि.3) घडला आहे.

याप्रकरणी किशोर नवनाथ आवटे (वय 19 रा. दत्तवाडी, शेलगाव) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून  प्रशांत जालींदर आवटे, प्रणव जालिंदर आवटे,सुरज जालिंदर आवटे,निरंजन अशोक आवटे, आकाश जालिंदर आवटे, योगेश धोंडीबा आवटे, अक्षय गजानन आवटे व दिलखिश एकनाथ आवटे (सर्व राहणार, शेलगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Dighi Crime News : हुंड्यात पैसे दिले नाहीत म्हणून विवाहितेला क्रुर वागणूक

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना काहीही काराण नसताना आरोपींनी शिवीगाळ करत हाताने व लाथाबुक्क्याने (Chakan Crime News) मारहाण करत जखमी केले आहे. ज्यामध्ये त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.